Viral Video Instagram
व्हायरल न्यूज

Ahmedabad Viral Video: भूत चहा- चुडैल कॉफी... अहमदाबादमधील स्मशानभूमीतील भयानक चहाची देशभर चर्चा

Viral Video: अहमदाबादमधील स्माशानभूमीतील भयानक टी स्टॉलची चर्चा देशभर सुरू आहे. अहमदाबादमधील या स्टॉलवर 'भूत चहा- चुडैल कॉफी' असा हटके मेन्यू देण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ahmedabad Bhayanak Tea Stall Video Viral:

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही मजेशीर तर काही भीतीदायक असतात. त्यात अनेकदा भूत-चुडैल असा भास होणारे व्हिडिओ असतात. त्यामुळे सर्वांनाच भीती वाटते. असाच एक भूताचा नव्हे पण भूताचा मेन्यू असलेल्या स्टॉलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या स्टॉलची सध्या देशभरात चर्चा होत आहे. (Viral Video)

गुजरातमधील अहमदाबादमध्ये हा भूताचा मेन्यू असलेला चहा-कॉफीचा स्टॉल आहे. अहमदाबादमधील सरदारनगरमध्ये एका स्मानाशात हा चहा कॉफीचा स्टॉल आहे. या स्टॉलवर लोकांची खूप गर्दी असते. अहमदाबादमध्ये हा स्टॉल खूप प्रसिद्ध आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत हा स्टॉल दाखवण्यात आला आहे. या स्टॉलचे नाव भयानक टी स्टॉल असे आहे. व्हिडिओत आजूबाजूला स्मशानभूमी दिसत आहे. या स्टॉलच्या बॅनरवर मेन्यू दिसत आहे. यात चुडैल चहा, डायन चहा, भूत कॉफी, तांत्रिक चहा, भूत चहा, मूर्दा चहा, अस्थी चहा, कब्रस्तान, प्रेत आत्मा चहा असा मेन्यू लिहला आहे. हा मेन्यू वाचूनच अनेकांच्या अंगावर शहारे आले असतील.

या स्टॉल मालकाचे नाव अनिल बजरंगी असे आहे. अंधक्षद्धा दुर करण्याचा यामागचा मूख्य हेतू असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्टॉलवर लोकांची खूप गर्दी होत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मंत्रालयातील प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांच्या नियुक्ता रद्द; Saam Tv इम्पॅक्ट

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT