After huge success of nagin dance cricket dance went viral watch funny video Instagram
व्हायरल न्यूज

Cricket Dance Viral Video: नागीण डान्सच्या अपार यशानंतर मार्केटमध्ये आलाय क्रिकेट डान्स; VIDEO पाहून पोट धरून हसाल

Viral Video: क्रिकेट डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Cricket Dance Viral Video:

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे. आगमनाच्या वेळी भाविक भन्नाट डान्स करताना दिसून आले होते. आता विसर्जनावेळी देखील भाविक मनसोक्त डान्स करताना दिसून येतील. आतापर्यंत तुम्हाला अनेक डान्स प्रकार पाहायला मिळाले असतील.

ज्यात नागीण डान्स आणि डिस्को डान्सर सारख्या डान्सर्सचा समावेश असेल. मात्र तुम्ही कधी क्रिकेट डान्स पाहिलाय का? नाही ना? मग हा व्हिडिओ एकदा पाहाच.

सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यात कॉमेडी आणि डान्स व्हिडिओचा समावेश असतो. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे ज्यात एक व्यक्ती क्रिकेट डान्स करताना दिसून येत आहे.

नागीण डान्स आणि डिस्को डान्स प्रमाणे क्रिकेट डान्सच्या देखील हटके स्टेप्स आहेत .या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की,मेहफील बसली आहे.

सर्वत्र उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे. त्याचवेळी एक व्यक्ती मध्ये उभं राहुन गोलंदाजी, फलंदाजी आणि झेल टिपण्याचा अॅक्शनने डान्स करताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. (Latest viral video)

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ themayankhardiya या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून, आतापर्यंत १ मिलियनपेक्षा अधिक लोकांनी लाईक केला आहे. हा डान्स पाहून नेटकरी देखील मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somwar 2025: पहिल्याच श्रावणी सोमवारी बनलेत 4 दुर्मिळ योग; 3 राशींवर बरसणार पाण्यासारखा पैसा

Office Snacks Recipe : ऑफिसमधल्या छोट्या भुकेसाठी हेल्दी स्नॅक्स, आताच ट्राय करा 'हा' पदार्थ

घराच्या कोपऱ्यात लपलेला तब्बल १२ फूट अजगर; व्हिडिओ पाहून शहारे येतील

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Aamir Khan : बॉलिवूडमध्ये खळबळ! आमिर खानच्या घरी एकाचवेळी २५ आयपीएस अधिकारी धडकले, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT