Long distance couple viral video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: 9 वर्षांनंतर अचानक समोर आला बॉयफ्रेंड आणि....! लॉन्ग डिस्टन्स कपलचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Long distance couple viral video: लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असलेल्या एका जोडप्याचा भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तब्बल ९ वर्षांनंतर प्रियकर अचानक परतल्याने प्रेयसीच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.

Surabhi Jayashree Jagdish

सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी एखादी गोष्ट लोकांना आवडली तर ती व्हायरल होते. सोशल मीडियावर आजकाल अनेक व्हिडीओ येतात आणि जातात पण काही व्हिडिओ खरोखरच मनाला भावूक करून जातात. सध्या असाच एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होताना दिसतोय.

ज्यामुळे लोक भावूक होऊन आनंदी होतायत. या व्हिडिओमध्ये असा क्षण कैद झालाय आहे ज्यामध्ये तब्बल नऊ वर्षांनंतर एक बॉयफ्रेंड अचानक त्याच्या गर्लफ्रेंड समोर येतो आणि तिला सरप्राईज देतो. यावेळी ती मुलगी आनंदाच्या भरात शॉक होते. यावेळी तिच्या चेहऱ्यावर आनंद, विश्वास आणि प्रेमाच्या भावना दिसतात.

९ वर्षांनंतर समोर येऊन बॉयफ्रेंडने दिलं सरप्राईज

व्हायरल व्हिडिओमध्ये, एक तरुणी कपड्यांच्या दुकानात खरेदी करताना दिसतेय. त्यावेळी अचानक एक तरुण अचानक समोर येतो. त्याला पाहताच तिला क्षणभर विश्वास बसत नाही की, तिच्या समोर उभा असलेला तोच पुरूष आहे ज्या व्यक्तीसोबत ती ९ वर्षांपासून लाँग डिस्टंट रिलेशनशिपमध्ये आहे. व्हिडिओमधील या महिलेची प्रतिक्रिया अत्यंत भावनिक आहे. ती हसते आणि नंतर आश्चर्याने तिच्या चेहऱ्यावर हात ठेवते.

आजूबाजूच्या लोकांच्या चेहऱ्यावरही दिसतो आनंद

असं म्हटलं जातं की, हे कपल विविध परिस्थिती आणि जबाबदाऱ्यांमुळे नऊ वर्षांपासून लाँग डिस्टंसमध्ये होते. मात्र असं असूनही त्यांच्यावरच प्रेमाचं नातं कमी झालं नाही. इतक्या वर्षांनंतर जेव्हा बॉयफ्रेंड अचानक आला आणि तिला सरप्राईज दिलं तेव्हा तो दोघांसाठीही तो खूप खास क्षण होता. दुकानातील इतर लोकही हे दृश्य पाहून भावूक झाले होते.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेकजण कमेंट करतायत. काही युझर्सने याला खऱ्या प्रेमाचं उदाहरण म्हटलंय. तर काही जण म्हणतायत की, जर प्रेम खरं असेल तर वेळ आणि लाँग डिस्टंस देखील अडचण ठरत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT