Viral AI-generated video falsely claims free electric cycles for Aadhaar card holders in India saam tv
व्हायरल न्यूज

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

Fact Check: आधारकार्ड धारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल देण्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडिओ खोटा असल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान मोदींनी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. AI द्वारे तयार केलेल्या या व्हिडिओमुळे नागरिकांची दिशाभूल होत आहे.

Sandeep Chavan

या व्हिडिओत स्वत: मोदी इलेक्ट्रिक सायकल मिळणार असल्याची घोषणा करतायत...हा व्हिडिओ आता व्हायरल होत असून, खरंच केंद्र सरकारने आधारकार्ड धारकांसाठी मोफत इलेक्ट्रिक सायकलची योजना आणलीय का...? आधारकार्ड तर आता सर्वांकडेच आहेत...मग सगळ्यांनाच इलेक्ट्रिक सायकल सरकार देणार आहे का...? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली...

या व्हिडिओत स्वत: मोदीच दिसत आहेत...त्यामुळे अनेकांनी यावर विश्वास ठेवलाय...अशी कोणती योजना आहे की सरकार इलेक्ट्रिक सायकल देतंय...? मोफत इलेक्ट्रिक सायकल मिळवण्यासाठी काय प्रोसेस आहे...? यासाठी काही फॉर्म भरायचा आहे का...? यासाठी नोंदणी कुठे करायची आहे...? याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी सुरू केली...याबाबत अधिक माहिती सरकारकडूनच मिळू शकते...त्यामुळे आमच्या व्हायरल सत्य टीमने हा व्हिडिओ कधीचा आहे...मोदींनी अशी घोषणा कधी केली...? याची माहिती मिळवली...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

आधारकार्डवर मोफत इलेक्ट्रिक सायकलची योजना नाही

पंतप्रधान मोदींनी अशी कोणतीही घोषणा केली नाही

व्हायरल होत असलेला मोदींचा व्हिडिओ AI निर्मित

पेट्रोल टंचाईमुळे सध्या व्हिडिओ व्हायरल होतोय

आधारकार्ड हे सगळ्यांकडेच असतात...आणि सध्या देशात इंधन टंचाईचा फटका अनेकांना बसतोय...त्यामुळे इलेक्ट्रिक सायकलचा हा व्हिडिओ व्हायरल करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलाय...अशी कोणतीही केंद्र सरकारची योजना नाही...खोटे मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल करून पैसे उकळण्याचाही डाव असू शकतो...त्यामुळे अशा बनावट व्हिडिओंवर विश्वास ठेवू नका...आमच्या पडताळणीत आधारकार्ड धारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल मिळणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...ब्यूरो रिपोर्ट साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT