Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: बापरे! सिंह आणि पाणगेंडा आमनेसामने; लढाई पाहून सिंहीण पण झाली थक्क, VIDEO एकदा पाहाच

Lion Vs Rhino: सिंहिणीला प्रभावित करण्यासाठी एक पाणगेंडा सिंहासोबत थरारक लढायला गेला, पण त्याला उलट आपलीच पराभव पत्करावी लागली. या लढतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, सिंहाची हार अनेकांना आश्चर्यचकित करत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर विविध प्रकारचे मनोरंजक व्हिडीओ प्रचलित आहेत. कधी स्टंट्स, कधी अनोखे जुगाड, तर कधी अपघातांचे दृश्य पाहायला मिळतात. यासोबतच प्राण्यांशी संबंधित व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. हे व्हिडीओ लोकांना मनोरंजन देतात आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित असल्यानं ते अधिक आकर्षक ठरतात.

सध्या सोशल मीडियावर एक पाणगेंडा आणि सिंहाच्या थरारक लढतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सिंहाची हार बघून अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडीओ वेगाने पसरण्याचं कारण त्याची अप्रतिम लढाई आणि आश्चर्यजनक परिणाम आहे. सिंहाला जंगलाचा राजा मानलं जातं, कारण त्याच्या शक्तीमुळे सर्व प्राणी आणि माणसाही त्याच्यापासून घाबरतात. पण एका व्हिडिओत सिंह आणि पाणगेंड्यातील लढतीने सर्वांना आश्चर्यचकित केलं.

या लढतीत सिंहाच्या ठिकाणी पाणगेंडा होता, जो सिंहाची हवा टाईट करताना दिसला. इथवरच नाही, सिंहाच्या बाजूला उभी असलेली सिंहीणही थक्क झाली. या थरारक आणि मनोरंजक लढतीच्या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलीच धूम माजवली आहे, आणि नेटकरी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. पाणगेंडा आणि सिंहाच्या संघर्षाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर '@wildtrails.in' अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मजेदारपणे लढाईसाठी तुमचा विरोधक म्हणून कोणाची निवड कराल याची काळजी घ्या असं लिहिलं आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी पाहिलं आहे आणि अनेकांनी त्यावर टिप्पणी करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एका युजरने म्हटलं, तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करू नका जर तुमचा मृत्यू झाला तर तिच्याशी लग्न करण्यास कोणीतरी तयार आहे. दुसऱ्या युजरने लिहिलं, आपल्या प्रेयसीला इम्प्रेस करताना जंगलाचा राजा जवळजवळ स्वतःला मारून टाकलं.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut water sweetness: फिकट की गडद? शहाळ्याचा रंगच सांगतो पाणी गोड आहे की नाही

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं कनेक्शन उघड

Ravi Varma Painting: पुण्यातील उद्योगपतीनं खरेदी केली १६७ कोटींची पेटिंग, नेमकं खास काय आहे?

ZP निवडणुकीनंतर शिंदे सेना अ‍ॅक्शन मोडवर; रायगडमधील शिवसेनेच्या प्रमुख नेत्याची पक्षातून हकालपट्टी

Dombivli : कल्याण हादरले! ३ रिक्षा चालकाने महिलेवर केला सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT