Russian Girl Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Russian Girl Viral Video: PM मोदींच्या स्वागतासाठी चिमुकलीची जय्यत तरी; लेहंगा घालून केला ठसकेदार भांगडा, VIDEO व्हायरल

Russian Girl Dance On Bhangra Viral Video: पंतप्रधान मोदी सध्या रशिया दौऱ्यावर आहे. रशियातील मॉस्को येथे त्यांचे मोठ्या उत्साहात करण्यात आले. त्यांच्या या स्वागतासाठी एका रशियन चिमुरडीने भांगडा केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशिया दौऱ्यावर आले. नरेंद्र मोदी सोमवारी मॉस्कोला पोहचले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. रशियाच्या पंतप्रधानांनी मॉस्कोच्या रेड स्क्वेअरमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यांनी मॉस्कोमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते. याचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी एका चिमुकलीने सुंदर डान्स केला आहे. तिच्या या डान्सने सर्वांचेच मन जिंकले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत एक लहान मुलगी डान्स करताना दिसत आहे. रशियातील एका चिमुरडीने पंजाबी वेशभूषा करुन हा सुंदर डान्स केला आहे. ढोल-ताशांच्या तालावर नाचत तिने आपला आनंद साजरा केला आहे. या मुलीच्या आजूबाजूला इतर अनेक अनेक लोक डान्स करताना दिसत आहे. ही मुलगी भांगडा करताना दिसत आहे. या मुलीचं निरागस सौंदर्य आणि सुंदर डान्सने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. ही मुलगी दिसायलाही खूपच सुंदर आहे.

ANI ने एक्स या अकाउंटवरुन व्हिडिओ शेअर केला आहे. या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या मुलीचा डान्स पाहून चेहऱ्यावर आपसूकच हसू आलं, एवढ्या लहान मुलीने किती सुंदर डान्स केलाय, डान्स इंडिया डान्स, अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Datiya Bypoll : निवडणुकीत पराभव होताच भाजपचा मोठा निर्णय; अख्खी कार्यकारिणी बरखास्त, पक्षात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

संध्याकाळी टाईमपास खायला बनवा क्रिस्पी मखाना चिवडा; रेसिपी आहे एकदम सोपी

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

SCROLL FOR NEXT