Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Video: बाई गं!...खेळताना दोन वर्षांचा चिमुकला अडकला तांब्याच्या कळशीत; बाहेर काढताना झाली सगळ्यांचीच दमछाक

Boy Stuck In Metal Pot: सोशल मीडियावर सध्या एक अजब असा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. ज्यात एका चिमुकल्याने जे केलं ते पाहून सर्वजण आश्चर्यात पडले आहेत. नक्की काय घडले ते एकदा व्हिडिओत पाहा.

Tanvi Pol

Shocking Child Video: लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. चिमुकल्यांचे हे खेळ, खोड्या आणि निष्पाप हावभाव हे पाहताना प्रत्येकालाच आनंद होतो. मात्र, याच खोड्यांमुळे कधी कधी थरारक प्रसंग घडतात. असाच एक धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारा प्रकार नुकताच समोर आला आहे. दोन वर्षांचा एक निरागस मुलगा खेळता खेळता तांब्याच्या मोठ्या कळशीत अडकला आहे.

नेमकं घडलं तरी काय?

हा चिमुकला(Little Boy) आपल्या घरात नेहमीप्रमाणे खेळत होता. घरात अन्य व्यक्तीही त्यांत्या कामात व्यस्त होते. काही वेळासाठी त्याच्याकडे घरातल्यांच लक्ष गेलं नाही आणि नेमकं याच क्षणी एका खोडकर क्षणात त्याने तांब्याच्या कळशीत बसण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्याला गंमत वाटली. पण त्याचा हा खोडसाळपणा काही क्षणांतच भीतीदायक ठरला.

चिमुकला कळशीत अडकताच त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्याने बाहेर येण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं संपूर्ण शरीर त्यात इतके घट्ट अडकले होते की तो बाहेर येऊ शकत नव्हता. काही क्षणांनी तो घाबरला आणि जोरजोराने रडू लागला. त्यानंतर घरातील सर्व सदस्य त्यांच्या दिशेने धावत आली आणि घडलेला प्रकार पाहिला.

घरातील हा प्रकार एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद करुन सोशल मीडियावर व्हायरल केला. काी तासांनतर या व्हिडिओला(Video) नेटकऱ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया आणि लाईक्स दिलेल्या आहेत. त्यातील एका यूजरने कमेंट केली,''आईने बाहेर काढल्यानंतर जाम मारलं असेल'' तर दुसऱ्या यूजरने लिहिले,''खुप करामती पोरगा दिसतोय'' तर काहींनी गमंतशीर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत २ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे बदली?

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार?

Saturday Horoscope: जोडीदारासोबत दिवस उत्तम, 5 राशींच्या व्यक्तींना पैशांची चणचण; वाचा शनिवारचे राशीभविष्य

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्र अव्वल; गणेशोत्सव चित्ररथाने मिळवला सर्वोच्च बहुमान

शरद पवार आणि अजितदादांची राष्ट्रवादी एक होणार? शोक सभेदरम्यान बड्या नेत्याने तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT