Viral News Saam Tv
व्हायरल न्यूज

Old Railway Tickets Viral: 'आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात' रेल्वेच्या जाड पुठ्यांची तिकीटे पाहून तुम्हीही व्हाल भावूक

Indian Old Railway Tickets: जुनी रेल्वे तिकिटे पाहून अनेकांच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. त्या जाड पुठ्ठ्याच्या तिकिटांची आठवण आजही लोकांना भावूक करते आणि बालपणातील प्रवास डोळ्यासमोर आणते.

Manasvi Choudhary

भारतात रेल्वेची सुरूवात १६ एप्रिल १८५३ साली झाली. तेव्हापासून आजवर रेल्वेच्या सेवेत अनेक मोठमोठे बदल झाले आहेत. रेल्वेच्या तिकीटापासून ते रेल्वेच्या आकारात नवीन बदल झाले आहेत. पूर्वी तिकिटे ही जाड पुठ्यावर असायची मात्र आता अनेक बदल झाले आहेत या सर्व गोष्टी आजही समोर आल्या तर माणसं भावूक होतात. सोशल मीडियावर सध्या ८०, ९० च्या दशकातली रेल्वेची जुनी तिकीटे व्हायरल होत आहेत.

सोशल मिडिया फेसबुकवर @आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात या अकाउंटवर रेल्वेची जुनी तिकीटे शेअर केली आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये, भारतीय रेल्वेच्या जाड पुठ्ठ्याच्या तिकिटाच्या आठवणी ... आजही आठवलं की, त्या जाड पुठ्ठ्याच्या तिकीटाची आठवण येते. हे तिकीट हातात घेतल्यावर एक वेगळाच फील यायचा, जणू काही प्रवासाची सुरुवात झाली आहे. त्या तिकीटावरचा रेल्वेचा शिक्का, तिकिटाचा नंबर आणि प्रवासाची माहिती... सगळं काहीतरी विशेष होतं.

तिकीट खिडकीवरची गर्दी, आरडाओरडा आणि तिकीट मिळवण्यासाठीची धडपड... हे सगळं आजही डोळ्यासमोर येतं. तिकीट हातात मिळाल्यावरचा आनंद काही औरच असायचा. आताच्या डिजिटल युगात, मोबाईल तिकीटांनी ह्या जाड तिकीटांची जागा घेतली आहे, पण आजही अनेकांना ह्या तिकीटांची आठवण येते. कारण, त्या तिकीटांच्या बरोबर, अनेक आठवणी आणि भावना जोडलेल्या आहेत. असं म्हटलं आहे.

सोशल मीडियावर या पोस्टला 42,000 पेक्षा अधिक लोकांनी लाईक्स केली आहे. नेटकऱ्यांनी कमेंट देखील केल्या आहेत. ही पोस्ट पाहून लोक आपल्या आठवणी जागवत आहेत. लोकांना तो काळ आठवतो ज्यावेळी कसलीही घाई, गडबड नसता अत्यंत साधा आणि सोपा प्रवास असायचा. अनेकांनी पोस्ट लाईकसह आपल्या आठवणी सांगितल्या आहेत. एका युजरने, आम्ही खेळताना हे पैसे म्हणून वापरायचो.. मस्त मजा यायची.. संपून गेलं ते आयुष्य.. असं म्हटलं आहे तर दुसऱ्याने, मी लहान असताना या तिकिटावर प्रवास केला आहे. असं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याला बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Karva Chauth 2025: स्त्रिया करवा चौथ व्रत करताना चंद्राची पूजा का करतात? जाणून घ्या कारण

Maharashtra Politics: NCP अजित पवार गटाच्या बड्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार? या केंद्रीय मंत्र्याचं सूचक विधान|VIDEO

Malti Chahar : तान्या मित्तलला रडवणारी मालती चहर आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT