Father Daughter Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Father Daughter Video: दमलेला बाबा आणि दमलेली लेक; दोघांमधला संवाद ऐकून तुम्हालाही रडू येईल; पाहा VIDEO

101 year old Father And His Daughter Viral video: प्रत्येक लेकीसाठी आपले आईवडिल सर्वात जास्त महत्त्वाचे असते. लेक सासरी गेली तरीही आपल्या आईवडिलांना भेटायला येते. अशीच एक लेक आपल्या १०१ वर्षीय वडिलांना भेटायला आली आहे. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Siddhi Hande

प्रत्येक लेकीच्या आयुष्यात तिच्या वडिलांचे सर्वात जास्त महत्त्व असते. मुलगी कितीही मोठी झाली तरी आपल्या आईवडिलांची साथ कधीच सोडत नाही. सासरी गेलेली मुलगी महिन्यातून एकदा तरी आपल्या आईवडिलांना भेटायला जाते. आईवडिलांनादेखील मुलींकडून फार अपेक्षा नसतात. आपल्या लेकीने आपल्याला येऊन भेटावे, आपल्याशी बोलावे आणि आपल्यासोबत वेळ घालवावा असेच त्यांना वाटत असते. असाच एक बापलेकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एक लेक आपल्या १०१ वर्षीय वडिलांना भेटायला आली आहे. आपल्या वडिलांना भेटून लेकीला खूप जास्त आनंद झाला आहे. त्यांची ही भेट पाहून प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. बापलेकीचा संवाद हा खूपच भावूक आहे. एकेकाळी वडिल आपल्या लेकीला विचारायचे की, तुला येताना काय खायला आणू? परंतु आता ही लेक आपल्या वडिलांना तुम्हाला काय हवंय असं विचारताना दिसतेय. व्हिडिओत मुलगी आपल्या वडिलांना म्हणते की, 'गिफ्ट काय हवंय? तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, सासरवरुन येताना घेऊन येते... काय पाहिजे ते सांगा?' त्यावर म्हातारे वडील आपल्या लेकीला म्हणतात, 'मला काहीही नको, फक्त तू पाहिजे'. आपल्या वडिलांचे हे वाक्य ऐकून मुलगी आपल्या वडिलांना कडकडून मिठी मारते. त्यांची ही मिठी जगातील सर्वात मोठे सुख आहे. बापलेकीचा हा प्रेमळ संवाद सर्वांनाच भावूक करणारा आहे.

mayuri_burangule या अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. माझे अजोबा कॄष्णा सोपान पोमण,वय वर्ष १०१ आयुष्यभर आपण आपल्या आई वडिलांना काही ना काही मागतंच असतो पण त्यांना मात्र फक्त आपला सहवास हवा असतो. तर मग जा. भेटुन या ! त्यांना घटट् मिठी मारून या, कारण आठवण आभास देते पण स्पर्श देत नाही !, असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे.

या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'हीच ती शेवटची पिढी आहे की ज्यांना तुम्ही पाहिजे ना की तुमचा पैसा', 'वय वाढतं तसं आई-वडील, आजी-आजोबा जणू लहान होतात, आपलं कर्तव्य आहे की त्यांना प्रेमाच्या सावलीत जपत रहावं, त्यांच्या आठवणींच्या फुलांना आदराने फुलवत रहावं', अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: अमावस्येच्या मध्यरात्री नग्न होऊन खोदायचा कबरी; महिलांचे मृतदेह बाहेर काढून भयंकर कृत्य; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

SCROLL FOR NEXT