Monalisa bhosale maha kumbh mela Saam Tv
viral-satya-news

Fact Check : प्रयागराजच्या महाकुंभात मोनालिसाची लॉटरी? 10 दिवसांत 10 कोटींची कमाई? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

Maha Kumbha 2025 : प्रयागराजच्या महाकुंभात मोनालिसानं माळा विकून १० कोटी रूपये कमावल्याचा दावा केला जातोय. कोण आहे ही मोनालिसा भोसले? ती महाराष्ट्रातली कुठली आहे ? तिनं खरंच कुंभमेळ्यात रग्गड पैसा कमावलाय का? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य. पाहूयात

Vinod Patil

Maha Kumbha 2025 : महाकुंभमेळ्यात सुंदर डोळ्यांची मोनालिसा भोसले सर्वांचंच लक्ष वेधून घेतीय. तिनं माळा विकून 10 दिवसांत 10 कोटी रूपयांची कमाई केलीय. या मेसेजमुळे मोनालिसा सोशल मीडियात पुन्हा एकदा चर्चेत आलीय. यंदाच्या कुंभमेळ्यात साध्वी हर्षानंतर प्रत्येकाच्या तोंडात नाव आहे ते मोनालिसाचं. आपल्या सुंदर डोळ्यांमुळे मोनालिसा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलीय. यूट्यूबर्सपासून ते सेल्फी घेणाऱ्यांपर्यंत सगळेचजण मोनालिसाच्या सौंदर्याचं कौतुक करतायेत.

मात्र तिने खरंच 10 दिवसांत 10 कोटींची कमाई केलीय कां? यावरून सोशल मीडियात चर्चाही रंगू लागलीय. त्यामुळे आम्ही या मेसेजची पडताळणी केली. आम्ही इंटरनेटवर मोनालिसाचे व्हिडीओ पडताळून पाहिले. तेव्हा तिनं दिलेली एक मुलाखत समोर आली. त्यात तिनं आपल्या कमाईबाबत स्पष्टपणे खुलासा केलाय. त्यात तिने काय म्हंटलंय पाहा.

माळा विकून आपल्याला काहीही मिळालं नाही. आपली कमाई 10 कोटी रूपये झाली असती तर इथे का राहिली असती. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहा...

कुंभमेळ्यात माळा विकणाऱ्या मोनालिसा भोसलेनं 10 दिवसांत 10 कोटी रूपये कमावालेले नाहीत.मोनालिसाचं खरं नाव मोनी असं आहे. भावाच्या शिक्षणासाठी तिला शाळा सोडावी लागली. माळा विकणं हा तिचा परंपरागत व्यवसाय आहे. मोनालिसा इंदूरची रहिवासी आहे. तिचं मूळ महाराष्ट्रातील आहे का? हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

त्यामुळे आमच्या पडताळणीत मोनलिसानं 10 दिवसांत 10 कोटी रूपयांची कमाई केल्याचा दावा असत्य ठरलाय. इतक्या कमी वेळात कुणीही इतके पैसे कमावू शकत नाही. केवळ तिच्या लोकप्रियेचा फायदा घेऊन काहीजण दिशाभूल करण्यासाठी असे मेसेज व्हायरल करतायेत. तुम्ही अशा मेसेजवर विश्वास ठेऊ नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: लातूर जिल्ह्यात तुफान पाऊस; तावरजा नदीला पूर

Maharashtra Rain Alert: दहीहंडीला पावसाची सलामी, मुंबई-रायगडला रेड अलर्ट, IMD चा अतिमुसळधार पावसाचा अंदाज

Breaking : मुंबईत अतिमुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली, दोघांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी

Saturday Horoscope : दहीहंडीचा उत्सव या राशींच्या लोकांसाठी खास ठरणार, वाचा शनिवारचं राशीभविष्य

Nasa : 2030 पर्यंत चंद्रावर कायमस्वरूपी मानवी वस्ती, नासा चंद्रावर उभारणार अणुभट्टी

SCROLL FOR NEXT