south africa won against india in icc womens world cup 2022 saam tv
viral-satya-news

ICC Women's World Cup: टीम इंडियाचं स्वप्न भंगलं; No Ball ठरला घातक, WI उपांत्य फेरीत

आजचा सामना भारतीय संघासाठी महत्वाचा हाेता.

साम न्यूज नेटवर्क

ख्राईस्टचर्च : अखेरच्या चेडूंपर्यंत फलंदाजांनी न डगमगता केलेल्या कामगिरीच्या जाेरावर आज (रविवार) महिला विश्वकरंडक क्रिकेट (ICC Women's World Cup 2022) स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघाने भारतीय संघाचा तीन गडी राखून पराभव केला. 'जिंकू किंवा मरु' अशा स्थितीत खेळणा-या टीम इंडियाचा (India) दक्षिण आफ्रिकेनं (south africa) पराभव केल्याने भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. बांग्लादेशवर (Bangladesh) माेठा विजय मिळवित सकाळी इंग्लंडने (England) उपांत्य फेरीत धडक मारली हाेती. भारतीय संघाच्या पराभवामुळे वेस्ट इंडीजचा (west indies) संघ उपांत्य फेरीत पोहचणारा चौथा संघ ठरला. (icc womens world cup cricket latest marathi news)

कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला हाेता. भारताने ५० षटकात सात बाद २७४ धावा केल्या हाेत्या. हा सामना भारतीय संघासाठी महत्वाचा हाेता. फलंदाजांप्रमाणे भारतीय गाेलंदाजांनी प्रारंभी उत्तम कामगिरी केली. त्यामुळे २७५ धावांचे उद्दीष्ठ घेऊन मैदानात आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात खराब झाली. हरमनप्रीत कौरने लिझेल ली (Lizelle Lee) हिला धाव बाद केले. लॉरा (Laura Wolvaardt) आणि लारा (Lara Goodall) या जाेडीने शतकी भागीदारी करुन दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. या दाेघींची दुसऱ्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी झाली.

दरम्यान राजेश्वरी गायकावडनं या जोडीस फोडल्याने सामना रंगतदार झाला. मात्र सामन्यावर भारतीय संघास माेहाेर उमटवता आली नाही. अखेरच्या षटकात दिप्ती शर्माची (deepti sharma) गोलंदाजी उत्तम झाली परंतु शेवटच्या चेंडूत तीन धावांची गरज असताना तिने नो बॉल टाकला (no ball) आणि आफ्रिकेने संधी साधली. दक्षिण आफ्रिकेच्या ५० षटकात सात बाद २७५ धावा झाल्या. भारताच्या पराभवामुळे क्रिकेटप्रेमींत नाराजी पसरली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

SCROLL FOR NEXT