VIDEO: Hingoli मध्ये जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार, Z.P. शाळेच्या छतामधून गळती Saam TV
Video

VIDEO: Hingoli मध्ये जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार, Z.P. शाळेच्या छतामधून गळती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

झेड. पी. शाळेच्या छतातून पाणी गळत असल्याचा प्रकार समोर येत आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील ब्रह्मपुरी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत हा प्रकार पुढे आला आहे. राज्यभरात जिल्हा परिषदेच्या शाळेतील दर्जा सुधारावा यासाठी राज्यसरकार वेगवेगळी पाऊले उचलत आहे, ग्रामीण भागातील नागरिक देखील स्वतःच्या खिशातील रक्कम खर्च करत आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी पुढाकार घेत आहेत मात्र हिंगोली मध्ये जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांवर पावसाने गळती लागलेल्या इमारती मध्ये बसून धडे गिरवण्याची वेळ आली आहे. ब्रह्मपुरी गावामध्ये पहिली ते पाचवी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत एकूण 70 विद्यार्थी शिक्षण घेतात, गावात शिक्षणाचा दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने गावातील पालक आपल्या चिमुकल्यांचा जीव धोक्यात घालून या शाळेत पाठवतात, धक्कादायक म्हणजे मागील वर्षभरापासून या गावातील जिल्हा परिषद शाळेची ही अवस्था असून याकडे लोकप्रतिनिधीसह हिंगोलीच्या शिक्षण विभागाने देखील दुर्लक्ष केल आहे, हिंगोलीच्या जिल्हा नियोजन मंडळामधून पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्तीसह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला असताना ब्रह्मपुरी गावात मात्र विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी वर्गखोल्या देखील उपलब्ध नाहीत, या सगळ्या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना आम्ही का पाठवाव? असा सवाल संतप्त पालक विचारत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सेनेची मनसे होणार? उद्धव ठाकरे CM शिंदेंवर मात करणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Rhea Chakraborty : रिया चक्रवर्ती ५०० कोटींच्या घोटाळ्यात अडकली?

Haryana Election Exit Poll Result : हरियाणात काँग्रेस ५०, भाजप १५ तर 'आप'ला शून्य जागा; एक्झिट पोलची आश्चर्यचकित करणारी आकडेवारी

२ चिमुकली मुलं, अंबरनाथमधून गायब, कल्याणमधून अपहरण अन् पालघरला थरार...

National Park: प्राणी प्रेमींनो! भारतातील 'ही' राष्ट्रीय उद्याने पाहिलीत का?

SCROLL FOR NEXT