Heavy police deployment in Yavat after communal tension; vehicles vandalized, police lathi-charge controlled the situation. Saam Tv
Video

Devendra Fadnavis: यवत गावात दोन गटात राडा, दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड; फडणवीस म्हणाले... VIDEO

Communal Tension In Yavat: पुणे जिल्ह्यातील यवतमध्ये आक्षेपार्ह स्टेट्समुळे दोन गटांत तणाव निर्माण होऊन दगडफेक झाली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बाहेरच्या लोकांनी हेतूपूर्वक तणाव वाढवल्याचा आरोप करत कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

Omkar Sonawane

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असलेल्या यवत गावामध्ये आज अचानक दोन गटामध्ये तणाव निर्माण झाला आणि याचे रूपांतर दगडफेक आणि हाणामारीमध्ये झाले. गावातील एका तरुणाने आक्षेपार्ह स्टेट्‍स ठेवल्याने दोन गटात मोठा राडा होऊन गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेची सगळी माहिती घेतली असून बाहेरच्या व्यक्तीने चुकीच स्टेटस ठेवल्याने आणि पुजाऱ्याने बलात्कार केल्याचा स्टेट्स ठेवल्याने तणाव निर्माण झाला आणि लोक रस्त्यावर आले. काही ठिकाणी लाठीचार्ज करावा लागला.

आता परिस्थिती नियंत्रणात आहे. दोन्ही समाजाची लोक एकत्रित बसली आहेत , तणाव संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही लोक जाणीवपूर्वक तणाव निर्माण झाला पाहिजे असे स्टेट्स ठेवत आहे आणि असे प्रकार घडवताना पाहायला मिळत आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांची सभा झाल्यानंतर स्टेटस ठेवले होते या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, काल सभा म्हणून असे स्टेट्स ठेवण्याची मुभा दिली आहे का ? चुकीच्या पद्धतीने धर्मावर अवलंब करणाऱ्यांवर टीका करण्याचे अधिकार नाहीत.

सभेचं आणि याच कारण जोडण्याचं कारण नाही. सभा झाली म्हणून आम्ही असे केले असं कुणी म्हणत असेल तर ते सहन केले जाणार नाही, आणि जे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहे, आता ते व्हिडिओ तिथले आहे की बाहेरचे हे बघावे लागेल ,अशावेळी अनेकवेळा बाहेरचे वीडियो टाकले जातात. या सगळ्या घटनेची चौकशी केली जाणार. सगळ्यांनी शांतता ठेवली पाहिजे कुणीही कायदा हातात घेतले नाही पाहिजे. असे आवाहन करत त्यांनी कुणीही बेकायदेशीर कृत्ये करत असतील तर त्याच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजपमध्ये इनकमिंग, मित्रपक्षांना धसका,भाजपकडून मित्रपक्षांवर दबावतंत्र?

Crime News: ५० हजारात केला नवऱ्याचा जिवाचा सौदा; बहिणीच्या दीराला दिली सुपारी

Jasprit Bumrah : भारतीय संघाला मोठा धक्का? आशिया कपमधून जसप्रीत बुमराह बाहेर?

Maharashtra Live News Update : सायना नेहवालने घटस्फोटातून घेतली माघार

Mahadevi Elephant: महादेवीनं चिमुकल्याला वाचवलं? महादेवी हत्तीणीचा व्हिडिओ व्हायरल?

SCROLL FOR NEXT