Tukaram Mundhe reaction to CM question saam tv
Video

IAS Tukaram Mundhe : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का? तुकाराम मुंढेंनी स्पष्ट शब्दातच सांगितलं, पाहा नेमकं काय म्हणाले?

Tukaram Mundhe reaction to CM question : तुकाराम मुंढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार का? पुण्यातील युवा महोत्सवात त्यांना मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर एफडीए आयुक्तांनी विश लिस्ट आणि भविष्यातील भूमिकेबाबत नेमकं काय सांगितलं? जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Maharashtra FDA Commissioner Tukaram Mundhe : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांना 'तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का?' असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी थेट हो किंवा नाही असे उत्तर न देता, आपल्या भूमिकेबद्दल आणि कामाच्या अनुभवाबद्दल सविस्तर भाष्य केले. पुण्यातील 'युवा महोत्सवा' या कार्यक्रमादरम्यान त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? असे विचारले होते. त्यावर तुकाराम मुंढे म्हणाले की, या गोष्टी विश लिस्टचा भाग आहेत, पण त्यांची अशी कोणतीही विश लिस्ट नाही.

या प्रश्नाचे उत्तर देताना तुकाराम मुंढे म्हणाले की, त्यांच्या बोलण्यापूर्वीच इतरांनी त्याचे वेगवेगळे अर्थ काढून घेतले आहेत. त्यांनी दहा वर्षांपूर्वीचे उदाहरण देत सांगितले की, २०१६ मध्ये सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदावरून त्यांची नवी मुंबई आयुक्तपदी बदली झाली होती . त्या वेळी जर कोणी त्यांना 'पुढे तुम्ही एफडीए आयुक्त होणार का?' असे विचारले असते, तर ते काय सांगू शकले असते?

कोणतीही व्यक्ती, भूमिका किंवा संस्था आपल्याला तेव्हाच भावते आणि आवडते, जेव्हा आपण तिच्याशी जोडले जातो, ती जगतो आणि तिचा अनुभव घेतो, असे त्यांनी नमूद केले. शेवटी, आज आपण ज्या परिस्थितीत आणि ज्या ठिकाणी आहोत, तिथली भूमिका आपण व्यवस्थित पार पाडली पाहिजे; पुढे काय व्हायचे हे काळ ठरवेल, असे म्हणत त्यांनी या विषयावर पडदा टाकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election: यूपी निवडणुकीत एकनाथ शिंदेंची एन्ट्री! ३५ जागांवर उमेदवार देण्याची तयारी; भाजपची डोकेदुखी वाढणार?

BJP MLA : मध्यरात्री थरार! भाजप आमदारांच्या ताफ्यातील २ गाड्यांना स्कॉर्पिओची जोरदार धडक; गाडी रस्त्यावर पलटली अन्...

Night Shift Health: सतत नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना हार्ट अटॅकचा धोका? नव्या संशोधनातून धक्कादायक बाब समोर

Ramayana Collection : 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर महाविक्रम! १००० कोटींच्या क्लबपासून फक्त एक पाऊल दूर

Maharashtra News Live Update: पुणे शहरातील 18 हॉटेल्सचे अन्न परवाने आणि नोंदणी FDA कडून निलंबित

SCROLL FOR NEXT