west bengal election result BJP workers chants Jai Shri Ram at Mamata banerjee residence / ANI saam tv
Video

West Bengal Result : ममता बॅनर्जींच्या घराबाहेर भाजप कार्यकर्त्यांच्या जय श्रीरामच्या घोषणा, VIDEO

jai shri ram slogans outside mamata house election counting : पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेत येणार आहे. मतमोजणी सुरू असताना सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा गाठल्यानंतर जल्लोष सुरू झाला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या घराबाहेर जय श्री रामच्या घोषणा दिल्या.

Nandkumar Joshi

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या निकालांचे कल बघता भाजप एकहाती सत्ता स्थापन करणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे देशभरातील भाजप नेते, कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. १५ वर्षांनी पश्चिम बंगालमध्ये सत्तापरिवर्तन होत आहे. भाजपनं जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आहे. भाजपला मोठा विजय मिळणार असल्याचं स्पष्ट होताच पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी थेट ममता बॅनर्जींचे घर गाठले. ममता बॅनर्जी यांच्या घराबाहेर जमून जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्याठिकाणी कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या.

दुसरीकडे, पश्चिम बंगालमध्ये मोठा विजय होणार असल्यानं पक्षाच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी कोलकाता येथील पक्षाच्या कार्यालयात झालमुडी वाटून विजयी जल्लोष केला. दरम्यान, भाजपने पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी लागणारा जादुई आकडा गाठला असून, विजयी आघाडी घेतली आहे. मात्र, संध्याकाळपर्यंत निकाल बदलतील. विजय आपलाच होईल, असा विश्वास ममता बॅनर्जींनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET Paper Leak: फेरपरीक्षेचा पेपरही फुटल्याचा दावा; 21 जूनचा NEET पेपर 10 लाखांत?

NEET पेपरफुटीचा 'गॉड'फादर कोण? 'गॉड' नावाच्या नंबरवरुन संशयास्पद संवाद

माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; निकटवर्तीय महिला नेत्याने दिला पक्षाच्या पदाचा राजीनामा

Shocking: भारतमातेचं रक्षण करणाऱ्या जवानाला न्याय मिळेना; ITBP जवानावर आईचा तुटलेला हात घेऊन भटकण्याची वेळ

एक वर्षात सरकार कोसळेल; बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT