Weather Forecast 9th July 2024 Saam TV
Video

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना आज पावसाचा रेड अलर्ट; कुठे-कुठे कोसळणार पाऊस?

Weather Forecast 9th July 2024 : मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Satish Daud

भारतीय हवामान खात्याने आज राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे आणि कोकणातील बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमधील शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या आजच्या (९ जुलै २०२४) सकाळ आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत.

दरम्यान, रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सोमवारी मध्यरात्रीपासून थोडीशी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे सखल भागात साचलेले पाणी ओसरल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई लोकल ट्रेनची सेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajinkya Rahane: KKR ने 'या' तीन खेळाडूंची लाज वाचवली? अखेरच्या क्षणाला अजिंक्य रहाणेसोबत 'या' खेळाडूंना घेतलं ताफ्यात

Weight Loss Tips: हिवाळ्यात खा हे पदार्थ, पोटाची ढेरी होईल कमी, दिसाल सडपातळ

French Fries Recipe: घरच्याघरी बनवा हॉटेलसारखे कुरकुरीत अन् टेस्टी फ्रेंच फ्राइज

Viral Post: ट्रांस्परंट पाकिटात डिलिव्हर झाली 'ती' खाजगी वस्तू, ऑफइसमध्ये सर्वांसमोर व्हावे लागले लज्जीत

Health: टवटवीत चेहरा आणि काळ्याभोर केसांसाठी उपयुक्त ठरेल तुमच्या किचनमधील 'हा' पदार्थ; सुरकुत्याही म्हणतील बाय बाय

SCROLL FOR NEXT