VIDEO: नवी मुंबईत कांदा-बटाटा मार्केटमधील पाणी लाईन कापली, माथाडी कामगार आक्रमक  Saam TV
Video

VIDEO: नवी मुंबईत कांदा-बटाटा मार्केटमधील पाणी लाईन कापली, माथाडी कामगार आक्रमक

Navi Mumbai Water News: पीएमसी कांदा बटाटा मार्केट मधील पाणी लाईन कापली, माथाडी वर्ग आक्रमक,माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी कांदा बटाटा मार्केट केला बंद.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी मुंबई: मोठी बातमी समोर येत आहे. एपीएमसी कांदा बटाटा मार्केट मधील पाणी लाईन कापण्यात आली आहे. नवी मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी पाणी लाईन कापल्याने माथाडीवर्ग आक्रमक झाला आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्याकडून कांदा बटाटा मार्केट बंद करण्यात आलं आहे. सर्व माथाडी आणि मापाडी कामगारांसह मनपा मुख्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं नरेंद्र पाटील म्हणाले. मार्केट मध्ये फिरून मार्केट बंद करण्यात येत असून मोर्चात सहभागी होण्याचे सर्व कामगारांना आवाहन करण्यात येत आहे. मनापा आयुक्तांची भेट घेऊन मार्केटचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं नरेंद्र पाटील यांनी सांगितलं आहे. जर आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही सानपाडा महामार्ग अडवणार असल्याचा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT