Walmik Karad News SaamTv
Video

Walmik Karad: वाल्मिक कराडचे पुण्यात आणखी ३ फ्लॅट, दुसऱ्या पत्नीच्या नावाने खरेदी

Santosh Deshmukh Case Update: वाल्मीक कराडचे पुण्यामध्ये असलेले फ्लॅट ज्योती जाधवच्या नावाने खरेदी करण्यात आले आहेत. ज्योती जाधव ही वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असल्याची माहिती उघड झाली आहे.

Priya More

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मीक कराडसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. वाल्मिक कराडचे पुण्यामध्ये आणखी तीन फ्लॅट असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील अमेनॉरामध्ये वाल्मीक कराडचे दोन फ्लॅट आहेत.

वाल्मीक कराडचे पुण्यामध्ये असलेले फ्लॅट ज्योती जाधवच्या नावाने खरेदी करण्यात आले आहेत. ज्योती जाधव ही वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असल्याची माहिती उघड झाली आहे. एक फ्लॅट हा शरद मुंडे याच्या नावावर तर दोन फ्लॅट हा ज्योती जाधवच्या नावावर आहे

बीड प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उज्ज्वल निकम यांच्याशी फोनवरून चर्चा केली. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी हे प्रकरण उज्ज्वल निकम यांच्याकडे द्या अशी मागणी केली होती. दरम्यान, याप्रकरणात अटकेत असलेल्या वाल्ममिक कराडला ७ दिवसांची एसआयटी कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Dal Benefits : हृदय अन् मेंदूसाठी वरदान! रोज मूठभर खा 'ही' डाळ, ७ फायदे वाचून व्हाल थक्क

RuPay आणि UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! ₹2,000 पर्यंतचे पेमेंट फ्री, नंतर चार्ज लागणार; सरकारचा मोठा निर्णय

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

SCROLL FOR NEXT