Pandharpur Saam TV
Video

Pandharpur : पंढरपूरात विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी ८७ किलो चांदीचा दरवाजा | VIDEO

Vitthal Rukmini Temple : पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी अहिल्यानगर इथल्या दोन व्यापाऱ्यांनी तब्बल 1 कोटी 10 लाख रुपये किमतीचा 87 किलो चांदीचा दरवाजा अर्पण केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील चौखांबी दरवाज्यावर आता चांदीचा झळाळता शृंगार पाहायला मिळतोय. कारण, अहिल्यानगर येथील दोन विठ्ठलभक्त व्यापाऱ्यांनी तब्बल १ कोटी १० लाख रुपये किमतीचा ८७ किलो वजनाचा चांदीचा दरवाजा श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण केला आहे. अतुल पारख आणि गणेश आव्हाड या भक्तांनी आपल्या सेवाभावातून हा अनुपम भेटवस्तू देवस्थानाला अर्पण केली आहे. हा दरवाजा विशेष कलाकुसरयुक्त असून, तो राजस्थानातील उदयपूर येथे बनवण्यात आला आहे.

या चांदीच्या दरवाजाची निर्मिती सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत करण्यात आली.दरवाज्यावर झालेली नक्षीकाम, कोरीव काम आणि सूक्ष्म तपशील पाहता, हे विठ्ठलभक्तांचे योगदान मंदिराच्या सौंदर्यात भर घालणारे ठरलं आहे.आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात लाखो भाविकांची उपस्थिती असताना, विठ्ठल मंदिरात झालेला हा चांदीचा शृंगार भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक ठरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CNG Price Today : CNG च्या दरात मोठी वाढ, मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा झळ; आजचे ताजे दर काय? वाचा

गणेशोत्सवात गौतमीच्या कार्यक्रमाला विरोध; 'धार्मिक कार्यक्रमात गौतमीचा धांगडधिंगा कशाला?'

महाराष्ट्र हादरला! उपचाराच्या बहाण्याने २० वर्षीय तरुणीचा विनयभंग; ठाकरेंच्या शिवसैनिकांनी डॉक्टरला बदडला, आरोपी गजाआड

Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

गणेशोत्सवाच्या तोंडावर सर्वसामान्यांना झटका! LPG सिलेंडर महागला, तुमच्या शहरात आज काय भाव?

SCROLL FOR NEXT