Virar Fake Currency Raid साम टीव्ही (AI Image)
Video

Fake Currency : विरारमध्ये ५०० च्या नोटांनी भरलेली कार पकडली; सगळी रक्कम पाहून पोलिसही चक्रावले | VIDEO

Virar Fake Currency Raid : पालघरच्या विरारमध्ये वसई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल १ कोटी रुपयांच्या बनावट ₹500 नोटा जप्त केल्या. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील शिरसाड फाटा येथे कारवाई करत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून रॅकेटचा तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

पालघर जिल्ह्यातील विरार परिसरात वसई गुन्हे शाखेच्या (क्राइम ब्रँच) युनिट-२ च्या पथकाने धडक कारवाई करत तब्बल १ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील विरार हद्दीतील शिरसाड फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. एका किआ (Kia) कारमधून बॅगेत भरून या बनावट नोटांची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही गाडी थांबवली. कारची पाहणी केली असता त्यात ५०० रुपयांच्या दरrot ० हजार बनावट नोटा (एकूण १ कोटी रुपये) आढळून आल्या.

या प्रकरणी पोलिसांनी 'MH 48 BT 8686' क्रमांकाची किआ कार, १ कोटी रुपयांच्या बनावट नोटा आणि एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. रात्रभर विरार येथील मांडवी पोलीस ठाण्यात या नोटांची मोजदाद सुरू होती. या बनावट नोटा नेमक्या कुठून आल्या आणि या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT