नाशिकमध्ये बांगलादेशात हिंदू अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात बंदची हाक देण्यात आली होती. परंतु त्याला हिंसक वळण लागले. त्यादरम्यान दगडफेक आणि राडा झाल्याची घटना घडली. नाशिकमध्ये झालेली दगडफेक आणि राडा सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. निवडणुकीचा सर्व्हे हा महायुतीच्या विरोधात असल्याने हा सर्व प्रकार होत असून हे सरकार जातीवादी असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. तर महाराष्ट्रात दंगली पेटणार असा दावा देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.