OBC Protest in Jalna Laxman Hake SAAM TV
Video

VIDEO : सरकारच्या शिष्टमंडळासमोरच OBC कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणा; काही वेळ गोंधळ

OBC Protest in Jalna Video : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या भेटीसाठी आलेल्या सरकारच्या शिष्टमंडळासमोरच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Nandkumar Joshi

ओबीसी आरक्षण बचावासाठी कार्यकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे जालन्यात मागील ९ दिवसांपासून उपोषण सुरुय. उपोषणाच्या ठिकाणी आज सरकारचं शिष्टमंडळ हाके आणि वाघमारे यांच्या भेटीला आलं. शिष्टमंडळात गिरीश महाजन, उदय सामंत, पडळकर आदी उपस्थित होते.

शिष्टमंडळातील नेते हाके यांच्यासोबत चर्चा करत होते. त्याचवेळी ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी या शिष्टमंडळातील प्रतिनिधींसमोरच जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळं काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. हे सरकार ओबीसी आणि मराठा समाजाशी खोटं बोलतंय, असा आरोप यावेळी हाके यांनी केला. सगेसोयरेची व्याख्या बदलणार कशी, असा प्रश्न विचारतानाच शिष्टमंडळाकडून सगळ्या मुद्द्यांवर लेखी मिळावं, त्यावेळीच उपोषण मागं घेऊ, असा निर्धार हाकेंनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping Position : डावी की उजवी कुशी? झोपण्याची कोणती पोझिशन आरोग्यसाठी आहे बेस्ट, जाणून घ्या

Monday Horoscope: बाप्पा मोरया! गणेशोत्सव 'या' राशींसाठी घेऊन येणार भरभराट; अचानक धनलाभाची शक्यता

... अन्यथा कोर्टात जाणार; मराठा क्रांती मोर्चाचा 15 दिवसांचा अल्टिमेटम, कारण काय?

Maharashtra News Live Update: लक्ष्मण हाकेंना दिलेली Y प्लस सुरक्षा तात्काळ काढा; मराठा क्रांती मोर्चाचा 15 दिवसांचा अल्टिमेटम

अमित शहा मुंबई दौऱ्यावर असतानाच केजरीवालांनी खेळला मोठा गेम; नव्या युतीनं वाढवली भाजपसह काँग्रेसची डोकेदुखी

SCROLL FOR NEXT