VIDEO: पीक विम्याच्या प्रकरणात फसवणूक? कृषीमंत्री Dhananjay Munde यांनी घेतली दखल Saam TV
Video

VIDEO: पीक विम्याच्या प्रकरणात फसवणूक? कृषीमंत्री Dhananjay Munde यांनी घेतली दखल

Dhananjay Munde ON Crop Insurance : सी एस सी केंद्र चालक शेतकऱ्यांकडून आगाऊ रक्कम वसूल केली जाते, विमा भरताना एक रुपयाच्या वर आगाऊ रक्कम देऊ नये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Saam TV च्या बातमीची कृषी मंत्र्यांकडून दखल घेण्यात आली आहे. राज्य शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीकविमा भरण्याची योजना सुरू केलेली आहे. मात्र सध्या खरीप हंगामाचा विमा भरताना काही सी एस सी केंद्र चालक शेतकऱ्यांकडून आगाऊ रक्कम वसूल करत असल्याच्या तक्रारी येत आहेत. सदर केंद्र चालकांना विमा भरून घेण्यासाठीचे मानधन शासन नियमित देते. त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांना विनंती आहे की विमा भरताना एक रुपयाच्या वर आगाऊ रक्कम देऊ नये. असं आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून करण्यात आले आहे. केंद्र चालकाने आगाऊ रकमेची मागणी केल्यास शक्य त्या पुराव्यासह कृषी हेल्प लाईनच्या 9822446655 या क्रमांकावर व्हाट्सप द्वारे थेट तक्रार करावी किंवा स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तक्रार द्यावी, सदर केंद्र चालकावर ग्रामविकास विभागाच्या मदतीने कडक कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. असा इशारा कृषी मंत्र्यांकडून देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही' १४ मागण्या मान्य, मंत्र्याची ग्वाही, तायवाडेंनी पाणी पिऊन उपोषण सोडलं

तब्बल २ कोटी मोबाइल नंबर अचनाक बंद, सरकारने का घेतला निर्णय, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: सोयाबीनच्या उभ्या पिकामध्ये शेतकऱ्यांनी सोडली जनावरे

Banana Peel chips : केळीची साल फेकून देताय? बनवा कुरकुरीत, चटपटीत चिप्स

Teacher Viral Video : मुख्याध्यापिकेचा माजुरडेपणा! शाळेत चिमुकल्यांकडून वर्गातच दाबून घेतले पाय, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT