BJP-Thackrey Group News SaamTv
Video

Maharashtra Politics : ठाकरे-फडणवीस पुन्हा येणार एकत्र? वंचितने केला मोठा गौप्यस्फोट !

Saam Tv

शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये चर्चा झाली असल्याचा मोठा दावा वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे. 25 जुलैला संजय राऊत दिल्लीत नड्डा यांना भेटले तर 5 ऑगस्टला फडणवीस ठाकरे यांना भेटायला मातोश्रीवर आले असल्याचं देखील त्यांनी म्हंटल आहे. त्यांच्या या खळबळजनक दाव्यानंतर आता ठाकरे आणि फडणवीस पुन्हा एकत्र येतील का? अशा चर्चा रंगल्या आहेत.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे 25 जुलैला दिल्लीत रात्री 2 वाजता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना भेटले आहेत. त्यानंतर 5 ऑगस्टला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उद्धव ठाकरे यांना भेटायला एकटे स्वत: गाडी चालवून मातोश्रीवर गेले होते. पुढच्या दिवशी लगेच 6 ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले होते. असा खळबळजनक दावा मोकळे यांनी केला आहे. तिथे ते कोणत्या नेत्यांना भेटले हे त्यांनी जनतेला सांगावं, असंही त्यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि भाजपमध्ये नेमकं काय खलबत सुरू आहे? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पुणे भाजप शहराध्यक्ष कसबा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक

IND vs BAN: टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! कानपूर कसोटी जिंकताच मोडले हे मोठे रेकॉर्ड

Badlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरण : शाळेच्या अध्यक्ष-सचिवांना मोठा झटका; कोर्टात नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

Dombivali News : खराब रस्त्यांमुळे महिलेचा मृत्यू; डोंबिवलीतील घटना, वयोवृद्धाचाही हात फ्रॅक्चर

CM Shinde: लाडक्या बहिणींनो! सावत्र भावांपासून सावध रहा; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT