VBA Assembly News SaamTv
Video

Assembly Election : वंचितची पहिली यादी जाहीर; बघा कोण आहेत 11 उमेदवार

VBA News : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आलीय. सर्व पक्ष जोरदार तयारीला लागलेत. यातच वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय.

Saam Tv

राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वीच वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. वंचितकडून राज्यातील ११ जागांवर उमेदवार दिलेत. यात रावेर, नागपूर दक्षिण मध्य, वाशिम, शिंदखेड राजा, शेवगाव, नांदेड दक्षिण या जागांचा समावेश आहे.

आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आलीय. सर्व पक्ष जोरदार तयारीला लागलेत. मतदारासंघांसह जागावाटपाची चाचपणीही केली जातेय. वंचित बहुजन आघाडीही तयारीला लागली असून त्यांनी आघाडी घेत विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे वंचितने रावेर मतदारसंघातून तृतीयपंथी उमेदवाराला रिंगणात उतरवलंय. शमिभा पाटील असे वंचितच्या रावेर मतदारसंघातून लढणाऱ्या उमेदवाराचे नाव आहे. शमिभा भानुदास पाटील या एक मराठी पारलिंगी सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या तृतीयपंथी हक्क अधिकार समितीच्या राज्य समन्वयक संस्थापक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना कुणाची? सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने ठाकरेसेनेला फटकारले; बेजबाबदार वक्तव्य थांबवा

PM Modi UAE Visit: तेल साठे ते एलपीजी पुरवठा; पंतप्रधान मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळाले?

Tragic Road Accident : भीषण अपघात! ट्रक धडकल्यानंतर प्रवाशांनी भरलेला ट्रॅक्टर तुंगभद्रा पुलावरून कोसळला, ६ जणांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: नागपूरचे तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहचले

Shocking: पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना, २ महिलांचे केस कापून अर्धनग्न करत धिंड काढली

SCROLL FOR NEXT