VBA News SaamTv
Video

VBA News : आधी काळे फासले, मग चाबकाने केली मारहाण; केज मतदारसंघातील घटनेने खळबळ | VIDEO

Kaij Assembly Constituency : केज मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण करत तोंडाला काळं फासलं आहे. या घटनेमुळे मतदारसंघात खळबळ उडाली आहे.

Saam Tv

केज मतदारसंघातील एका अपक्ष उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा दिला. मात्र या उमेदवाराने भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्याने संतप्त वंचितचे पदाधिकारी आक्रमक झालेले बघायला मिळाले. यावेळी त्यांनी या उमेदवाराला आधी काळे फसून नंतर मग चाबकाने केली मारहाण देखील केली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

बीडच्या केज मतदार संघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा नामांकन अर्ज अवैध ठरल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यांना पाठिंबा दर्शवला होता. मात्र सचिन चव्हाण या अपक्ष उमेदवाराने भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्याने वंचितचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. भाजप उमेदवाराला पाठिंबा का दिला? म्हणून वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी अपक्ष उमेदवाराला आधी काळे फासलं. त्यानंतर चक्क चाबकाने फटके दिले. एवढेच नाही तर त्याचा व्हिडिओ काढून माफी देखील मागायला लावली. घटना केज राखीव मतदारसंघातील अंबाजोगाई शहरातील आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान या प्रकरणी अद्याप पोलिसात कसल्याच गुन्ह्याची नोंद झाली नाही.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT