USA SAAM TV
Video

US Work Permit Rules : अमेरिकेच्या निर्णयाचा होणार परिणाम, भारतीयांच्या नोकरीवर टांगती तलवार? | VIDEO

DHS New Rule : अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने (DHS) परदेशी नागरिकांसाठी असलेली स्वयंचलित वर्क परमिट मुदतवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० ऑक्टोबर २०२५ पासून हा नियम लागू होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमेरिकेत काम करणाऱ्या लाखो परदेशी व्यावसायिकांना, विशेषतः भारतीय कामगारांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाने (DHS) परदेशी नागरिकांसाठी असलेली स्वयंचलित वर्क परमिट मुदतवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन नियमानुसार, ज्यांचे वर्क परमिट नूतनीकरण अर्ज प्रलंबित आहेत, अशा परदेशी कामगारांना त्यांच्या वर्क परमिटची मुदत संपल्यानंतर ५४० दिवसांपर्यंत काम करत राहण्याची पूर्वीची सोय आता मिळणार नाही. ३० ऑक्टोबर २०२५ पासून हा नियम लागू होणार असून, त्यानंतर नूतनीकरणासाठी अर्ज करणाऱ्यांना मंजुरी मिळेपर्यंत काम थांबवावे लागू शकते. या निर्णयाचा मोठा फटका एच-१बी व्हिसाधारकांचे जोडीदार, एल आणि ई श्रेणीतील व्हिसाधारकांचे जोडीदार, एफ-वन व्हिसाधारक विद्यार्थी आणि आश्रय निर्वासितांना बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death : काम करण्याची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती; अजित पवारांच्या निधनानंतर प्रकाश आंबेडकरांची भावुक पोस्ट

अजितदादांच्या विमानाचं टेकऑफ ते अपघात...नेमकं काय घडलं ?

Ajit Pawar Death: अजित पवारांचे 'ते' ५ मोठे निर्णय; धडाडी निर्णयांनी बदलली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

नजर जाईल तिथपर्यंत कार्यकर्त्यांची अलोट गर्दी, अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी जमला जनसमुदाय|VIDEO

Thursday Horoscope : जुन्या चुकांमधून धडा घ्यावा लागेल; ५ राशींच्या लोकांना जपून निर्णय घ्यावे लागेल

SCROLL FOR NEXT