Surangi Flowers Saam TV
Video

Sindhudurg : मार्च- एप्रिलची 'सुरंगी' चक्क जूनमध्ये बहरली | VIDEO

Surangi Flowers Bloom : मार्च- एप्रिल मध्ये फुलणारी 'सुरंगी' चक्क जुन महीन्यात बहरली आहेत.सुरंगीची फुले अतिशय सुगंधी असतात त्यामुळे मार्केट मध्ये त्यांना मोठी मागणी आहे.सुरंगीच्या फुलांमुळे वेंगुर्ले तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठे आर्थिक उत्पन्न मिळते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मार्च- एप्रिल मध्ये फुलणारी 'सुरंगी' चक्क जुन महीन्यात बहरली आहेत. प्रत्येक फुलांचा बहर हा त्या-त्या ठरलेल्या हंगामामध्ये येत असतो. मात्र बिगर मौसमात आणि त्यात दमदार पावसाच्या हंगामामध्ये न फुलणारी सुरंगी बहरली आहेत. कुडाळ तालुक्यातील आवेरे गावातील यशवंत पालकर यांच्या सुरंगीच्या झाडांना आश्चर्यकारक बहर आला आहे. सुरंगीची फुले अतिशय सुगंधी असतात त्यामुळे मार्केट मध्ये त्यांना मोठी मागणी आहे.

याचा वापर गजरे बनविण्यासाठी तसेच या फुलांपासून सुगंधी अत्तर बनविण्यासाठी मोठ्याप्रमाणात होतो. मार्च-एप्रिल या दोन महिन्यात बहरणा-या या सुरंगीच्या फुलांमुळे वेंगुर्ले तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठे आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र बिगर हंगामातील सुगंधी सुरंगीचा बहर हा सुखद धक्का देणारा असून हा वातावरणातील बदलांचा परिणाम असल्याचे यशवंत पालकर यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: रमजानच्या महिन्यात पुणे हादरलं! किरकोळ वादानंतर ६ जणांनी फैसलच्या छाती, पाठीत भोसकला चाकू, CCTV Video व्हायरल

Crime: पाणी वाया का घालवतो? जाब विचारल्याने तरुणाची सटकली; सुरक्षारक्षकाला जागीच संपवलं

Maharashtra Live News Update: दारव्हा कारंजा मार्गावरील टोलनाक्यावर काॅग्रेसची धडक

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅक येण्याच्या 24 ते 48 तास आधी शरीराकडून नेमके कोणते संकेत मिळतात?

चुलीवर स्वयंपाक करताना आईला मिठी मारली; उकळते दूध अंगावर पडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT