इथलं पाणी अदानींना विकलं जातंय, आताची लढाई महाराष्ट्र प्रेमी आणि महाराष्ट्रद्रोही यांच्यासोबतची आहे, असा गंभीर आरोप या सभेतून उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या आदमापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. कोल्हापुरातून चांगली सुरुवात झाली. कोल्हापुरात अंबाबाईचं दर्शन घेतलं. बाळू मामांचे आशीर्वाद घेतले. आता तुमचं दर्शन घेऊन पुढे जाणार आहे. तुमचा उत्साह पाहिल्यानंतर हा राधानगरी मतदारसंघ गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही यात शंका नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.
मधल्या काळात ग्रहण लागलं. मी तुमची हात जोडून माफी मागतो. ती चूक माझ्याकडून झाली. पण तुम्ही मोठ्या मनाचे. तुम्ही सर्व केलं. आमदार तुम्ही केलं. मी उमेदवारी दिली. तुमच्या पाठीत वार करायला काही लोक उभे आहेत. आणखी काय द्यायचं होतं. आमदार केलं. मान सन्मान प्रेम दिलं सर्व दिल्यानंतर शिवसेना नावाच्या आईवर वार करणारा माणूस तुमचा होऊ शकतो का?, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस नेते सतेज पाटील यांना पुढं बोलावलं. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलेला दिसला. 'एका गोष्टीचं बरं वाटलं. सतेज सोबत आहेत. सतेज तुमचं नाव घेतल्यावर उत्साह पाहिला. एक गोष्ट चांगली झाली का म्हटलं कारण इथल्या विजयाची जबाबदारी मी सतेजवरच टाकतोय. शाहू महाराज सोबत आहेत. त्यांचे आशीर्वाद आहेत. हा जोश पाहिजे. शिवरायांचा महाराष्ट्र हा जोशपूर्णच पाहिजे, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.