उद्धव ठाकरे यांचा भाजपवर इतिहासाशी संबंधित हल्लाबोल.
भाजपचा स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग नसल्याचा आरोप.
मतचोरी आणि पक्ष फोडण्याच्या आरोपांची पुनरावृत्ती.
भाजपचा सहभाग ना स्वातंत्र्य लढ्यात नाहीये. इतकेच नाही तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सुद्धा त्यांचा सहभाग नाहीये. असं हे लोक आयत्या बिळावर नागोबा आहे, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावला. डाव्या पक्षांच्या कार्यक्रर्मात त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला. शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फूट, मतचोरी अशा मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. भाजप आयत्या बिळावर बसलेला नागोबा आहे. आता ते लोकांकडून दूध पाजण्याच्या गोष्टी करत आहेत. याचा कोणाशी काही संबंध नाही. ना की भाजप देशाला कोणता विचार देऊ शकले. स्वत:चे विचार नसल्यानं भाजप नेहमी नेहरूंवर खापर फोडत असतात, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
सत्तेत येऊन ११ वर्ष झाली तरी भाजप नेते नेहरूंवर दोष देत आहेत. भाजप कायद्याचा वापर त्यांच्या सोयीनुसार करत आहे. एकीककडे रोकड सापडली म्हणून वसई-विरार आयुक्तांना ईडीनं अटक केली. दुसरीकडे एका मंत्र्याच्या घरात पैशांनी भरलेली बॅग सापडली पण त्याला समज देऊन सोडून दिलं. एखाद्याला आयुष्यातून उठवायचं असेल तर काही खोटं प्रकरणात अडकवून त्यांना तुरुंगात टाकलं जातं. त्यानंतर न्यायालयात त्यावर दोन तीन वर्ष सुनावणी होते. मग तपास यंत्रणा आमच्याकडे पुरावे नाहीत म्हणून त्यांना सोडून देते. पण त्या व्यक्तीचे तीन वर्ष वाया जातात, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.