ठाकरे सेनेच्या उमेदवाराला मशाल चिन्ह मिळालं नाही. त्यामुळे अंबादास दानवे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाब विचारला.  saam tv
Video

ठाकरे सेनेच्या उमेदवाराला मशाल चिन्ह नाही! कुठे घडला हा प्रकार?

shiv sena mashaal symbol controversy : महापालिका निवडणुकीत महायुतीचे सर्वाधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यावर विरोधकांनी शंका उपस्थित केली असतानाच, आता छत्रपती संभाजीनगरात ठाकरे सेनेच्या उमेदवाराला मशाल चिन्ह मिळालेलं नाही. त्यामुळं अंबादास दानवे आक्रमक झाले.

डॉ. माधव सावरगावे

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आता झडायला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे मतदानाआधीच महायुतीचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यावरून विरोधकांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर आरोप केले आहेत. तसेच निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांसाठी काम करत असल्याचाही आरोप होत आहे. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सावित्रीबाई हिरालाल वाणी या प्रभाग क्रमांक ४ मधून रिंगणात आहेत. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही निवडणूक निर्णय अधिकारी मशाल चिन्ह देत नसल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात शिवसेना नेते अंबादास दानवे पोहोचले. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी ते प्रचंड आक्रमक झाले होते.

याआधी छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारांना माघारीसाठी मंत्री धमकावत असल्याचा, तसेच काही अधिकारी सत्ताधाऱ्यांचे गुलाम असून, फोनाफोनी करत असल्याचा आरोप दानवे यांनी केला होता. सगळ्यांचे खातेपुस्तक आहे. हिशेब ठेवू. वेळ आल्यावर व्याजासकट परतफेड करू, असा इशाराही त्यांनी दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makeup Tips: अजूनही नीट मेकअप करता येत नाही? मग रोज मेकअपसारख्या ग्लोसाठी लावा 'या' तीन गोष्टी

मुंबई हादरली! पिस्तुल काढलं अन् स्वत:वर धाड धाड गोळ्या झाडल्या, कांदिवलीत ४५ वर्षीय व्यक्तीचा टोकाचा निर्णय

TATA Sierra चं सर्वात स्वस्त मॉडेल कोणतं आहे?

Maharashtra Live News Update:आमदार सुरेश धस यांच्यावरील टीकेचा निषेध; आष्टीत सोशल फोरमचा 'टोणगा मोर्चा'

Buldhana Accident: नांदुरा- बुऱ्हाणपूर मार्गावर भीषण अपघात,भरधाव वडाप टॅक्सी खड्ड्यात उलटली

SCROLL FOR NEXT