Uddhav Thackeray recalls Anant Tare’s advice during Thane event; admits regret over not listening, says Sena would’ve stayed united. Saam TV Marathi News
Video

Uddhav Thackeray : तरेंचं न ऐकल्याचा ठाकरेंना पश्चाताप; म्हणाले, '...तर शिवसेना फुटलीच नसती'

Uddhav Thackeray recalls Anant Tare’s advice : उद्धव ठाकरेंनी ठाण्यातील कार्यक्रमात अनंत तरेंच्या आठवणींना उजाळा देत मोठं वक्तव्य केलं. त्यांनी सांगितलं की, जर अनंत तरेंचं ऐकलं असतं तर शिवसेना फुटलीच नसती. ठाकरेंनी यावेळी एकनाथ शिंदेवरही जोरदार टीका केली.

Namdeo Kumbhar

Uddhav Thackeray regrets not listening to Anant Tare : शिवसेनेतील फूट अन् एकनाथ शिंदेंच्या बंडावर बोलताना त्या गोष्टीचा पश्चाताप होत असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.ठाण्यात आयोजित एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. त्यावेळी त्यांनी अनंत तरेंच्या आठवणींना उजाळा दिला. अनंत तरेंचं ऐकायला हवं होतं. आता पश्चाताप होतोय असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

ठाण्याचे माजी महापौर दिवंगत अनंत तरे यांचं ऐकायला हवं होतं. त्यावेळी त्यांचं ऐकलं असतं तर शिवसेना फुटलीच नसती. आता त्या गोष्टीचा पश्चाताप होत असल्याची खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. ठाकरेंनी यावेळी बोलताना एकनाथ शिंदेवर टीकेचा बाण सोडला. ते म्हणाले, त्यांना आता पदं मिळालेली आहेत. पण त्यांचा वापर ज्यावेळी संपेल, त्यावेळी त्यांना कचराकुंडीत फेकून देतील. त्यावेळी कपाळावर हात बडवत तुम्हाला ते याच ठाण्यात दिसतील. अनंत तरेंचं तेव्हाच ऐकायला हवं होतं. आता मला पश्चाताप होतोय.तेव्हा तरेंचं ऐकलं असतं, तर शाहांसमोर हंबरडा फोडणारे बघायला मिळाले नसते, असे ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Road Accident : ४८ तासांत 3 मोठे अपघात, 53 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Maharashtra Politics: 'मी रमीचा खेळाडू नव्हे, तर...'भाजपमध्ये प्रवेश करताच सांगळेंचा मंत्री कोकाटोंवर घणाघात

Maharashtra Live News Update: कोंढवा गणेश काळे हत्या प्रकरण; सोशल मीडियावर हत्येचं समर्थन करणारा व्हिडिओ पोस्ट

Daya Dongre: चित्रपटात आपला ठसा उमठवणाऱ्या दया डोंगरे निवडणार होत्या 'हे' करिअर; पण झाल्या अजरामर अभिनेत्री

Bihar Election: ऐन निवडणुकीच्या प्रचारादरम्यान RJDने आपल्याच उमेदवाराला पक्षातून काढलं? काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT