Uddhav Thackeray addressing a massive rally in Nashik with sharp remarks against BJP, sparking political debate in Maharashtra. saam tv
Video

Uddhav Thackeray: भाजप हा दलालांचा उपटसुंभांचा पक्ष ; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Nashik Speech: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा झाली. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटातील अनेक जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला.

Bharat Jadhav

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची नाशिकमध्ये संयुक्त सभा झाली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीसांनी नाशिक शहर दत्तक घेतलं होतं. पण ज्यांना राजकारणात पोरं होत नाहीत ते आमची पोरं दत्तक घेत आहेत. ते काय शहरं दत्तक घेणार? असा टोला उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला. भाजप हा उपटसुंभांचा पक्ष झाला असून त्यांना पक्ष चालवायला भाजपला बरबटलेली माणसं चालतात.

दुसरीकडे आमच्याकडे पोरांचा तोटा नाही. मोठे केलेले गेली असतील पण ज्यांनी मोठं केलं ती माणसं सोबत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही एकत्र आल्यानंतर ज्यांनी फटाके फोडले दुसऱ्या दिवशी तेच तिकडे गेले. वाईट निष्ठावान कार्यकर्त्यांचे वाटत आहे. देवयानी ताई यांच्याबाबत मला आदर आहे. त्यांना रडू आलं. तुमची निष्ठा ज्या पक्षाशी आहे, तो पक्ष आज उपऱ्यांचा दलालांचा पक्ष झाल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सांगलीत पावसाने दडी मारल्याने भात पीक धोक्यात

Shiv Sena Case Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? युक्तिवादाला सुरूवात, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट

Blouse Trendy Designs: साधी साडी असो वा पैठणी, 'या' ब्लाऊज डिझाइन्स देतील सुंदर लूक; पाहा ७ ट्रेंडी डिझाइन्स

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, १ तोळा सोनं किती रुपयांना? वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं गुजराती भाषेमधून भाषण; सोशल मीडियावर तुफान चर्चा|Video Viral

SCROLL FOR NEXT