भरत मोहोळकर, साम टीव्ही
मुंबई : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगलीय. त्यातच राज ठाकरेंनी पहिल्यांदाच मुलगा अमित ठाकरेंना माहिममधून उमेदवारी जाहीर केलीय.. तर शिंदे गटाने सदा सरवणकर तर ठाकरे गटानेही महेश सावंतांना रिंगणात उतरवलंय. त्यामुळे 'राज'पुत्र अमित ठाकरे चांगलेच चक्रव्यूहात सापडलेत. मात्र अमित ठाकरे आणि महेश सावंतांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय..
2019 मध्ये राज ठाकरेंनी पुतण्या आदित्य ठाकरेंविरोधात वरळीतून उमेदवार न देत कौटुंबीक संघर्ष टाळला होता. त्यामुळे आता अमित ठाकरेंना माहिममधून उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने उद्धव ठाकरे पुतण्याला पाठींबा देणार का? याविषयी उत्सुकता होती. मात्र पाठिंब्याच्या चर्चा राऊतांनी फेटाळून लावत अमित ठाकरे हे परिवारातील सदस्य असले तरी माहिममधून निवडणूक लढवणारच, अशी भूमिका ठाकरे गटाने घेतलीय.
मनसेने आदित्य ठाकरेंविरोधात संदीप देशपांडेंची उमेदवारी जाहीर केल्यानंतर ठाकरे गटानेही माहिममधून महेश सावंतांना रिंगणात उतरवलंय. त्यामुळे दादर माहिम मतदारसंघात सदा सरवणकर, महेश सावंतांना उमेदवारी देत शिंदे गट आणि ठाकरे गटाने अमित ठाकरेंविरोधात चक्रव्यूह रचलंय..त्यामुळे दादर-माहिम या शिवसेना भवनच्या प्रांगणातील बालेकिल्ला ठाकरे गट राखणार की राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे चक्रव्यूह भेदणार? याकडे लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.