Uddhav Thackeray and Raj Thackeray Saam Tv
Video

Thackeray Brothers : ठाकरे बंधूंची पुन्हा भेट, नेमकं कारण काय?

Raj Thackeray visits Matoshree to meet Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा भेटले आहेत. या भेटीनंतर राज्यात युतीच्या चर्चेला पुन्हा जोर आला आहे. बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची ही भेट महत्वाची मानली जात आहे.

Namdeo Kumbhar

Raj Thackeray | Uddhav Thackeray : ठाकरे बंधूंची पुन्हा एकदा भेट झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा युतीच्या चर्चेला जोर आलाय. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सातत्याने भेट होत आहे. कधी सण तर कधी कौटुंबिक कारणामुळे दोन्ही भावांमध्ये भेट होत आहे. आगामी बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर या भेटी होत असल्यामुळे मनसे-शिवसेनेची युती होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून अनेकदा युतीवर सकारात्मक भाष्य करण्यात आले आहे. एकत्र राहण्यासाठी सोबत आलो आहोत, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले होते. त्याशिवाय राज ठाकरेंनीही मराठीच्या मुद्द्यावर सर्व बाजूला ठेवून एकत्र यायला हवं, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नवी युती होणार का? याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. आज राज ठाकरे अचानक मातोश्रीकडे रवाना झाले आहेत. ही भेट नेमकी कोणत्या कारणामुळे होत आहे? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : "आपण कुठलेही काम 100% च करतो, अन्यथा करत नाही" अजित पवार यांचे शरद पवारांसमोर जोरदार भाषण

बॉस असावा तर असा! दिवाळीची तब्बल ९ दिवसाची सुट्टी, घरी राहा आणि मज्जा करा; थेट CEO चा ईमेल

Fridge Cleaning Tips: फ्रिजचा रबर काळा पडलाय? मग महागडे क्लिनर कशाला? 'या' जबरदस्त ट्रिक्स करा फॉलो

Maharashtra Political Tension: महायुतीत वर्चस्वाची लढाई; भाजपनंतर राष्ट्रवादी दाखवणार ताकद, अजित पवार गट देणार धक्का

Sangram Jagtap: वादग्रस्त विधानावर आमदार संग्राम जगतापांचे स्पष्टीकरण|VIDEO

SCROLL FOR NEXT