The sacred sword of Goddess Tulja Bhavani is traditionally kept at Wakojibuwa Math for daily rituals, not missing as reported Saam Tv
Video

तुळजाभवानी मंदिरातील तलवार अखेर सापडली, नेमकी कुठे ठेवली होती? VIDEO

Tulja Bhavani Temple: तुळजाभवानी मंदिरातील शक्ती संचरित तलवार गहाळ नसून वाकोजीबुवा मठात दररोजच्या पूजेसाठी सुरक्षित ठेवली आहे, अशी माहिती मंदिर संस्थानाने दिली आहे.

Omkar Sonawane

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरातील शक्ती संचरित अष्ट आयुधांपैकी एक असलेली तलवार गहाळ झाल्याच्या आरोपामुळे गेल्या काही दिवसांपासून खळबळ माजली होती. या प्रकरणावर अखेर मंदिर संस्थानाने प्रेस नोट जाहीर केली आहे. तलवार गहाळ नसून ती सुरक्षित असून दररोजच्या पूजेसाठी वाकोजीबुवा यांच्या मठात ठेवली असल्याचे मंदिर संस्थानाने स्पष्ट केले आहे.

तुळजाभवानी देवीच्या गर्भगृहात असणाऱ्या अष्ट आयुधांपैकी ही तलवार अत्यंत पवित्र मानली जाते. काही माध्यमांतून ही तलवार गायब झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर पुजारी मंडळानेही मंदिर संस्थानावर गंभीर आरोप केले होते. मात्र, मंदिर संस्थानाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, ही तलवार मंदिरात ठेवलेली नसली तरी ती सुरक्षित असून वाकोजीबुवा मठात नियमित पूजेसाठी ठेवण्यात येते. मंदिर संस्थानाने स्पष्ट केलं आहे की, माध्यमांमधून पसरवण्यात आलेल्या बातम्या निराधार असून तलवारीसंदर्भात कोणतीही गहाळीची बाब नाही. संस्थानाच्या म्हणण्यानुसार, पूजेसाठी ही तलवार महंतांच्या मठात ठेवण्याची परंपरा आहे, आणि ती अजूनही त्या ठिकाणीच सुरक्षित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भयंकर दुर्घटना! नव्याने बांधलेली इमारत कोसळली; ३ जणांचा मृत्यू,अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ खडसे घरवापसी करणार? विनोद तावडेंसोबतच्या भेटीचे फोटो समोर

High Blood Pressure : पावसाळ्यात वाढतो हाय BP चा धोका, 'या' चुका करणे आताच थांबवा

चपाती की भाकरी? काय खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढते?

India vs England: टीम इंडियासाठी आज 'करो या मरो', चौथ्या टी-20 च्या प्लेईंग 11 मधून कोणाला डच्चू मिळणार?

SCROLL FOR NEXT