Devotees to receive Chitale Bandhu’s famous ladoo prasad at Tulja Bhavani Temple from July 25 onwards. Saam Tv
Video

तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी गोड बातमी! २५ जुलैपासून मिळणार चितळे बंधूंच्या लाडूचा प्रसाद | VIDEO

Tulja Bhavani Mandir Ladoo Prasad: २५ जुलैपासून तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना प्रसिद्ध चितळे बंधूंच्या लाडूचा प्रसाद मिळणार आहे.

Omkar Sonawane

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या २५ जुलैपासून तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना प्रसिद्ध ‘चितळे बंधूंच्या लाडूंचा प्रसाद’ दिला जाणार आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते होणार असून, प्रसाद वाटपाचा कार्यक्रम २५ जुलै रोजी पार पडणार आहे. या संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक आज तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या सभागृहात पार पडली. यामध्ये लाडू प्रसाद वाटपासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. लाखो भक्तांच्या श्रद्धेचा विचार करून मंदिर प्रशासनाने हा उपक्रम हाती घेतला असून, त्यामुळे भाविकांना भक्तीच्या सोबतच स्वादिष्ट प्रसादाचाही लाभ मिळणार आहे. महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठापैकी एक असलेल्या तुळजाभवानी मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे चितळे बंधूंचा लाडू प्रसाद ही एक विशेष आकर्षण ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आहो सुदामे! रीलस्टार अथर्व सुदामेला PMP कडून तिसरी नोटीस, 50 हजारांचा दंड

मुंबईनंतर पुण्यात तुफान राडा; शिंदे गटाच्या दोन गटाच्या २ उमेदवारांवर हल्ला, वडगाव शेरीत दगडफेक

Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

Thursday Horoscope : स्वभावातला हेकेखोरपणा सोडा, नाहीतर...; ५ राशींच्या लोकांनी राहा सावधान

भाजपचा सत्तेसाठी अकोट पॅटर्न? विचारधारेला तिलांजली; AIMIM शी घरोबा, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT