MLA Disqualification Case Update SaamTv
Video

MLA Disqualification Case Update : आमदार अपात्रता सुनावणी आज होणार?

Supreme Court : शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावरील सुनावणी आज होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 18 सप्टेंबरला ही सुनावणी होणार असल्याचं बोललं जात होत. मात्र कोर्टाच्या आजच्या कामकाज यादीत या प्रकरणाचा समावेश असल्याने ही सुनावणी आज होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Saam Tv

मंगळवारी रद्द करण्यात आलेली शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आज होणार असल्याचे निश्चित झाले आहे. ही सुनावणी 18 सप्टेंबरला घेऊ असे संकेत काल सुप्रीम कोर्टाने दिले होते. मात्र आता कोर्टाच्या आजच्या कामकाजाच्या यादीमध्ये या दोन्ही प्रकरणांचा समावेश असल्याने ही सुनावणी आज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सुनावणीदरम्यान नेमक काय होईल, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. एकीकडे राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला लागले आहेत. तर दुसरीकडे या सुनावणीला गेल्या काही दिवसांपासून सातत्याने लांबणीवर टाकण्यात येत आहे. या आधी ही सुनावणी २ आठवडे लांबणीवर टाकली होती. त्यानंतर मंगळवारी देखील प्रकरण नंबर १ दिवसभर ऐकलं जाणार असल्याने आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी झाली नव्हती. त्यानंतर ही सुनावणी 18 सप्टेंबरला होईल असं बोललं जात होतं. मात्र आता ही सुनावणी आज आज होणार असल्याच समजत असल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरले! प्रिन्सिपलने ८ वर्षांच्या विद्यार्थ्याचा घेतला चावा; गळा दाबून २० सेकंद हवेत उचलले

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसाचा तडाखा; चाळीसगावजवळतच्या गांधी चौकातील नगरपालिकेची जुनी इमारत कोसळली

Cholesterol medicine: सकाळी की रात्री? रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलची औषधं कधी घेतली पाहिजेत?

Beauty Tips: डार्क अंडरआर्म्सपासून सुटका हवी? तर हे उपाय करतील मदत

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा दिपकेंना फोन, लग्नाबाबत काय विचारलं? | Video

SCROLL FOR NEXT