शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांचा काल वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या कार्यक्रमात आमदारांनी तलवारीने केक कापला. कापलेला केक त्यांनी तलवारीनेच पत्नी आणि मुलांना केक भरवला, याचा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल होत आहे. यावर बुलढाणा पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता या सर्व प्रकारावर आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तलवारीने केक कापणे हा गुन्हा होऊ शकत नाही असं संजय गायकवाड यांनी सांगितलं. तलवारीने केक कापण्यामागे कुणाला इजा पोहचवण्याचा हेतू नव्हता असंही संजय गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. पोलीस परेडवेळी देखील तलवार दाखवतात त्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल होणार का असा सवाल संजय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. तलवारीने केक कापणं गुन्हा असेल तर ऑलिंपिक मधील तलवार बाजीचा गेम सुद्धा रद्द करावा लागेल असंही संजय गायकवाड यांनी यादरम्यान म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.