Zika Virus In Pune: पुणेकरांची चिंता वाढली! पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव Saam TV
Video

Zika Virus In Pune: पुणेकरांची चिंता वाढली! पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव

Pune News: पुण्यातून एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. पुण्यात झिका व्हायरसनं डोकं वर काढलं आहे. झिका व्हायरसचे पुण्यात दोन रुग्ण आढळून आले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: पुण्यात एरंडवणा परिसरात झिकाचे व्हायरसचे २ रुग्ण आढळल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे.एक डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिकाचा संसर्ग झाला आहे. त्या दोघांवरही सध्या उपचार सुर आहेत. डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला ताप आणि लाल चट्टे उठल्याची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. मिळालेल्या माहितीनूसार, त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींमध्ये अद्याप संसर्गाची लक्षणे दिसून आली नाही आहेत. पुण्यात यावर्षी प्रथमच झिका व्हायरसची नोंद झाली आहे. त्यामुळे महापालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. पुण्यात अचानक झिकाचा शिरकाव झाल्याने नागरिकांचे टेन्शन मात्र वाढले आहे.

नेमकी झिका व्हायरसची लक्षण काय?

डोकेदुखी होणे, सौम्य ताप येणे,शरीरावर पुरळ उठणे, स्नायू आणि सांधेदुखी ही झिका व्हायरसची लक्षणे आहेत.

कशी घ्याल काळजी?

जर एखाद्या व्यक्तीला झिका व्हायरसची लक्षणे दिसत असल्यास त्या व्यक्तीने लगेच डॉक्टरांकडे जावे, तसेच इतर व्यक्तींच्या संपर्कात न येणे. घरात किंवा घराबाहेर जास्त काळ पाणी साठवून न ठेवणे. त्याचबरोबर डोके दुखी किंवा ताप येत असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : डोकं शांत राहील, या राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा शनिवारचे राशीभविष्य

शरद पवार गटात मोठा फेरबदल होणार; महिला अध्यक्ष बदलणार, नावही ठरलं

Papaya Combination: पपईसोबत 'हे' ५ पदार्थ खाणे टाळाच, कॉम्बिनेशन ठरू शकते घातक

मच्छिमारांना मिळणार थेट 20-22 हजार रुपये; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Poultry Farming: कुक्कुटपालन व्यवसायासाठी किती कर्ज मिळते? अर्ज कसा कराल

SCROLL FOR NEXT