Papaya Combination: पपईसोबत 'हे' ५ पदार्थ खाणे टाळाच, कॉम्बिनेशन ठरू शकते घातक

Priya More

आरोग्यदायी फायदे

पपई हे फळ खूपच आरोग्यदायी असते. त्याचे शरीराला अनेक फायदे होतात. त्याच्या बिया देखील खूप फायदेशीर असतात.

Papaya Combination | Social Media

आरोग्यासाठी घातक

पपईसोबत काही पदार्थ खाणं हे आरोग्यासाठी घातक ठरते. त्यामुळे अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात.

Papaya Combination | Social Media

पपई आणि दही

पपईसोबत दही खाल्ल्याने शरीराचे नुकसान होते. पपई उष्ण अन् दही थंड असते. ते खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि डोकेदुखीची समस्या होऊ शकते.

Papaya Combination | Social Media

पपई आणि संत्री

पपई आणि संत्री खाल्ल्याने शरीरात विषारी घटक तयार होतात. यामुळे अतिसार, बद्धकोष्ठता आणि अपचन होऊ शकते.

Papaya Combination | Social Media

पपई आणि दूध

पपईसोबत दूध घेणे हानिकारक ठरू शकते. पपईसोबत दूध प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि अतिसारासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Papaya Combination | Social Media

पपई आणि कारले

कारल्यासोबत पपई खाल्ल्याने आरोग्याला मोठे नुकसान होऊ शकते. दोन्ही एकत्र खाल्ले तर डिहायड्रेशन होईल आणि आम्लपित्ताची प्रतिक्रिया होऊ शकते.

Papaya Combination | Social Media

पपई आणि लिंबू

पपईसोबत लिंबू खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. रक्ताशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. ॲनिमियाचा त्रासही होऊ शकतो.

Papaya Combination | Social Media

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. साम टिव्ही याचं समर्थन करत नाही.

Papaya Combination | Social Media

NEXT: १५ दिवस चुन्याचे पाणी प्यायल्याने काय होते?

Chuna Water | Social Media
येथे क्लिक करा...