Traffic Jam In Thane Saam Tv
Video

VIDEO: ठाणे- घोडबंदर रोडवर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवाशांचे हाल

Priya More

ठाण्यामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. ठाण्यातील माजीवाडा जंक्शन परिसरामध्ये वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मेट्रोचे काम आणि वाहनं बंद पडल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे ते घोडबंदर आणि घोडबंदर ते ठाणे या रस्त्यावर ही वाहतूक कोंडी झाली आहे. घोडबंदर रोडवर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी झाल्यामुळे प्रवाश्यांचे हाल होत आहे. वाहनं एकाच ठिकाणी थांबल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मोठ मोठे कंटेनकर, ट्रक, कार, टँकर या वाहतूक कोंडीमध्ये अडकले आहेत. ठाण्याकडून घोडबंदरकडे जाणारे आणि घोडबंदरकडून ठाण्याकडे येणाऱ्या प्रवाशांचे हाल होत होत आहे.

बुधवारप्रमाणे आज देखील ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. ठाण्याहून घोडबंदर रस्ता तसेच नाशिक रोड या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. आज पहाटेपासून ठाणेकर नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. घोडबंदर रोड या ठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाचा फटका ठाणेकरांना बसत आहे. बंद असलेले सर्व्हिस रोड आणि खड्डे यामुळे आज दुसऱ्या दिवशी देखील ठाणेकर नागरिकांना वाहतूक कोंडीला समोर जावे लागत आहे. या ट्राफिक जाममुळे कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना ऑफिसला जाण्यासाठी उशिर होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

Lebanon pager explosion : लेबनॉनमध्ये पुन्हा एकदा भीषण हल्ला, पेजर स्फोटांमागे कुणाचा हात? पाहा व्हिडिओ

Assembly Election: आमदारांमध्ये उमेदवारीवरून नाराजीचा सूर, अजित पवारांना हुरहुर?

SCROLL FOR NEXT