Thane Metr SAAM TV
Video

Thane Metro : ठाणेकरांचे मेट्रोचं स्वप्न साकार, आजपासून ट्रायल रन सुरू | VIDEO

Thane Metro Trial Run : ठाणे शहरात पहिली मेट्रोसेवा लवकरचं धावणार आहे. गायमुख येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो ट्रायल रनचे उद्घाटन केले जाणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. ठाणे शहरात पहिली मेट्रोसेवा लवकरचं सुरु होण्याच्या मार्गावर आहे. आजपासून या मेट्रोची पहिली ट्रायल रन सुरु होणार आहे. गायमुख येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ही ट्रायल रन पार पडणार आहे. ठाणेकरांच्या वाहतुकीसाठी हा टप्पा महत्वाचा मानला जातो. मेट्रो सुरू झाल्यानंतर शहरातील वाहतूककोंडीला मोठा दिलासा मिळणार असून प्रवाशांचा अमूल्य वेळही वाचणार आहे. दररोजच्या प्रवासात होणारी कोंडी, प्रदूषण आणि ताणतणाव यामध्येही घट होणार आहे. ठाणेकरांच्या दीर्घ प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळणार असून लवकरच मेट्रोसेवा नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

ठाणे मेट्रोची १० स्थानकं पुढिल प्रमाणे : -

कॅडबरी, माजीवडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकूजी-नी-वाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवानिवाडा आणि गायमुख

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Facebook : १ लाख व्ह्यूजमागे फेसबुक किती पैसे देतो? जाणून घ्या

Mumbai Tourism: मुंबईपासून काहीच अंतरावर आहे निसर्गाचा खजिना, 'या' ठिकाणी येताच थकवा विसराल

Mumbai News : देवीची मूर्ती आणायला जाताना आक्रीत घडलं, टँकरने उडवले, भक्ताचा जागीच मृत्यू

Bhandara : शेळ्यांसाठी चारा आणायला गेला अन् खड्ड्यात बुडाला; तरुणाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: पैठण तालुक्यात चार दिवसांपासून मुसळधार

SCROLL FOR NEXT