ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल सोशल मीडियाचे क्रेझ लोकांमध्ये प्रचंड वाढले आहे.
सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया अॅप फेसबुक आहे, जे कंटेंट क्रियेशनचे एक चांगले माध्यम आहे.
लोक फेसबुकवर फोटो तसेच व्हिडिओ अपलोड करतात, ज्यासाठी फेसबुक त्यांना पैसे देखील देते.
तर जाणून घेवूया फेसबुक वरुन एक लाख व्ह्यूज वर किती पैसे मिळतात.
फेसबुकवर 1 लाख व्ह्यूजवर थेट पैसे मिळत नाहीत तर ते व्हिडिओमध्ये दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातींवर अवलंबून असते.
तेसेच प्रेक्षक कुठे आहेत आणि कोणत्या देशात आहेत यावरही कमाई अवलंबून असते.
उदाहरणार्थ, युरोपीयन देशांमधून जास्त कमाई होते म्हणजेच, दर १००० व्ह्यूजमागे सुमारे ३ ते ५ डॅालर मिळतात.
भारतामध्ये फेसबुक वरील १ लाख व्ह्यूजमागे साधारण ७०० ते ३००० रुपये मिळू शकतात, म्हणजेच दर १००० व्ह्यूजमागे अंदाजे १ ते ३ डॅालर मिळतात.