Thane: Shocking viral video shows Marathi youth being beaten by shopkeepers over a recharge dispute near the railway station. 
Video

Thane : ठाण्यामध्येच मराठी तरूणाला जोरदार मारहाण, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Marathi youth assaulted near Thane : ठाणे रेल्वे स्थानकाजवळ मोबाईल रिचार्जच्या वादातून मराठी तरुणाला दुकानदारांनी बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Namdeo Kumbhar

Thane Viral Video News : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात मोबाईल रिचार्जसाठी गेलेल्या किरण जाधव या मराठी तरुणाला दुकानदारांनी जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, किरण जाधव याने रिचार्जसंदर्भात दुकानदाराशी वाद घातला, जो नंतर हाणामारीत बदलला. दुकानदारांनी किरणला बेदम मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोन दुकानदारांना ताब्यात घेतले. पोलिसांनी किरणच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात अशा घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे, तर स्थानक परिसरातील सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Goverment Jobs : MPSC मार्फत परीक्षेची मागणी! CID मधील भरती प्रक्रियेवर परीक्षार्थींचा आक्षेप, 'त्या' ८ मुद्द्यांवरून विद्यार्थ्यांच संतप्त सवाल

Maharashtra News Live Update: MPSC उत्तीर्ण मुलाची गावातून भव्य मिरवणूक; आईला खांद्यावर घेऊन व्यक्त केला आनंद

Beauty Tips : पापण्यांचे केस सुंदर, लांब आणि घनदाट हवेत? घरच्या घरी करा हे ६ उपाय

Kitchen Hacks : फ्रिजमध्ये कुठेही काहीही ठेवता? जाणून घ्या कोणत्या रॅकमध्ये काय ठेवावं, नाहीतर होईल नुकसान

Google search safety: गुगलवर कधीही सर्च करू नका 'या' 7 गोष्टी; पडू शकतं महागात

SCROLL FOR NEXT