VIDEO: Team INDIA आज मायदेशी परतणार! चाहते स्वागतासाठी सज्ज Saam TV
Video

VIDEO: Team INDIA आज मायदेशी परतणार! चाहते स्वागतासाठी सज्ज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चॅम्पियन टीम इंडिया आज मायदेशी परतणार आहे. चाहते स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. भारताच्या संघाने फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. या सामन्यात विजयी झाल्यानंतर भारताचा संघ काही काळ बार्बाडोसमध्येच थांबला. बार्बाडोसमधील वातावरण खराब झाल्यामुळे तेथील सरकारने विमानतळ बंद ठेवले होते. परंतु टीम इंडिया लवकरच मायदेशी परतणार आहे. त्यामुळे आता क्रिकेट चाहते भारताच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत.

टीम इंडिया मायदेशी परतणार : भारताच्या संघाने २९ जून रोजी T-२० विश्वचषकाचे जेतेपद (T-20 World Cup Champion Team India) टीम इंडियाच्या नावावर केले. त्यानंतर भारतातील क्रिकेट चाहत्यांच्या (Indian Cricket Fans) भावना त्याचबरोबर खेळाडूंच्या भावना पाहायला मिळाल्या. जगभरामध्ये इमोशन्सचा पूर पाहायला मिळाला. सोशल मीडियावर चाहत्यांनी फोटो, व्हिडीओ शेअर करून भारताच्या संघाचे कौतुक केले, त्यांचे अभिनंदन सुद्धा केले. हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, अक्षर पटेल त्याचबरोबर भारताचे इतर खेळाडूंना चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. फायनलचा सामना झाल्यानंतर भारताचा संघ काही काळ बार्बाडोसमध्ये होता. चाहत्यांना उत्सुकता आहे ती म्हणजेच चॅम्पियन टीम इंडिया भारतामध्ये कधी परतणार?

चाहत्यांची प्रतीक्षा संपली

भारतीय क्रिकेट संघ आज मायदेशी परतणार आहे. त्यासाठी भारतीय संपूर्ण भारत आणि क्रिकेट चाहते स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. भारत चौथ्यांदा विश्वविजेता झाला त्यामुळे चॅम्पियन झाल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना लवकरात लवकर ट्रॉफीसह भारतात पोहोचायचे होते, परंतु बार्बाडोसमधील वादळाने त्यांच्या आशा धुळीस मिळवल्या. सामना शनिवारी झाला त्यानंतर बार्बाडोसमध्ये रविवारी रात्री मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर सोमवारी या मुसळधार पावसाचं रूपांतर वादळात झालं. या घटनेमुळे बार्बाडोस सरकारने तेथील विमानतळ रविवारी संध्याकाळी ६ वाजेपासून बंद ठेवले होते. त्याचबरोबर रात्री ६ वाजेपासून लॉकडाऊन लागू केले. यानंतर सर्वजण आपापल्या हॉटेल आणि घरात थांबले.

या वेळेला टीम इंडिया भारतात परतणार

ताज्या अपडेटनुसार बार्बाडोसमधील वादळ आता शमले आहे. त्यामुळे आज भारताचा संघ बार्बाडोसच्या स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता दिल्लीला रवाना होईल. बीसीसीआयने विशेष चार्टरद्वारे त्याच्या भारतात येण्याची व्यवस्था केली आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ च्या सुमारास पोहोचेल. भारतीय संघाचे स्वागत करण्यासाठी चाहते आधीच विमानतळावर आतुर झाले आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले होते की, रविवारी दुपारी ते रवाना होणार होते, मात्र या चक्रीवादळामुळे त्यांनी संघासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मी संघाला एकटे सोडू शकत नव्हते. संघ नंतर दुसऱ्या चार्टरद्वारे निघणार होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Emotional Girls: या मुली असतात फारच हळव्या, जरा काही बोल्लं की लगेच रडतात

Amravati Accident: कॉलेजवरून घरी जाताना काळाचा घाला, दोन दुचाकींची समोरासमोर धडक, जीवलग मित्रांचा जागीच मृत्यू

शरीरात अचानक 'हे' बदल दिसले तर समजा तुम्ही अति-प्रमाणात साखर खाताय

VIDEO : पंतप्रधान मोदींकडून फडणवीसांचं कौतुक!

Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध; राऊतांचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT