Team India Celebration at Wankhede in Mumbai SAAM TV
Video

VIDEO : सूर्याने तो कॅच नाही तर वर्ल्डकप पकडला; चाहत्याच्या प्रतिक्रियेचा व्हिडिओ बघून तो अविस्मरणीय क्षण डोळ्यांसमोर येणारच!

Team India Celebration in Mumbai : टीम इंडिया वर्ल्डकप विजयाच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईत आलीय. खेळाडूंच्या स्वागतासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केलीय. मरीन ड्राइव्हवर निळा सागर दिसतोय. एका चाहत्यानं सूर्यकुमारनं फायनलमध्ये घेतलेल्या अप्रतिम झेलचा उल्लेख केला.

Nandkumar Joshi

Team India Celebration : टीम इंडियानं १७ वर्षांनंतर टी २० वर्ल्डकप जिंकला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या अंतिम लढतीत भारतीय संघानं विजय मिळवून अवघ्या देशाला गिफ्ट दिलं. या अंतिम सामन्यात अखेरच्या षटकात पहिल्याच चेंडूवर सूर्यकुमार यादवनं सीमारेषेवर अप्रतिम झेल घेतला. त्यामुळं सामना फिरला. सूर्यकुमारनं घेतलेला हा झेल अविस्मरणीय आहे. जेव्हा जेव्हा भारतीय क्रिकेटचा इतिहास सांगितला जाईल, तेव्हा सूर्यकुमारने घेतलेल्या झेलचा उल्लेख होईल. आता टीम इंडिया वर्ल्डकप घेऊन मुंबईत आली आहे. मुंबईत खेळाडूंची ओपन बसमधून परेड होणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानात चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. रस्ते खचाखच भरलेले आहेत. आपल्या चॅम्पियन्सला भेटण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. सूर्यकुमारने तो झेल नाही, वर्ल्डकपच पकडला होता. तो कॅच नाही तर मॅच होती, अशी प्रतिक्रिया एका चाहत्यानं दिलीय. याशिवाय मैदानात आणि मैदानाबाहेर रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या यांच्या नावाच्या घोषणा दिल्या जात आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

Nana Patole : 'मला बाजूला केलं नाही, आमच्यात भांडण लावू नका'; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Nalasopara News : धक्कादायक..खासगी शिकवणीतील शिक्षिकेची मुलीला बेदम मारहाण; दहा वर्षीय मुलीची मृत्यूशी झुंज

SCROLL FOR NEXT