Sushma Andhare Helicopter Crash  Saam TV
Video

Special Report | Sushma Andhare यांचं हेलिकॉप्टर क्रॅश, अंधारे थोडक्यात बचावल्या

Sushma Andhare News Today | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश झालं. याच हेलिकॉप्टरमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मुंबईत पोहोचले. आणि तिथून ते हेलिकॉप्टर महाडला गेलं, तिथून ते बारामतीला जाणार होतं. त्यामुळे एका अर्थानं आणि सुदैवानं जयंत पाटीलही बचावले म्हणता येईल. मुंबईला आल्यानंतर जयंत पाटील शरद पवारांसोबत जळगावला रवाना झाले.

Saam TV News

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश झालं. याच हेलिकॉप्टरमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मुंबईत पोहोचले. आणि तिथून ते हेलिकॉप्टर महाडला गेलं, तिथून ते बारामतीला जाणार होतं. त्यामुळे एका अर्थानं आणि सुदैवानं जयंत पाटीलही बचावले म्हणता येईल. मुंबईला आल्यानंतर जयंत पाटील शरद पवारांसोबत जळगावला रवाना झाले. सुषमा अंधारे बारामतीला सु्प्रिया सुळेंच्या प्रचारासाठी आयोजित केलेलया महिला मेळाव्याला चालल्या होत्या. या हेलिकॉप्टरमधून मुंबईत जयंत पाटील उतरले आणि त्यानंतर हे हेलिकॉप्टर सुषमा अंधारे यांना घ्यायला महाडला गेले. महाडहून हे हेलिकॉप्टर बारामतीला जाणार होते. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश झालं महाडमध्ये झालेल्या या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. सुषमा अंधारे आणि पायलट दोघेही सुखरुप आहेत क्रॅश होण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. क्रॅश होतानाची दृश्यं समोर आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भुसावळ तालुक्यातील हातनुर धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले

CSMT Khau Galli : CSMT जवळच्या 'खाऊ गल्ली'ची जागा बदलणार, दुकानदारांना BMC च्या नोटिसा, कारण काय?

चमत्कारच! मृतदेह चितेवर ठेवला, अग्नी देण्यापूर्वीच महिलेनं केलं असं काही, सगळे हादरले!

Akola Crime : दगडाने ठेचून एकाची निर्घृण हत्या; मारेकरी मृतदेहाजवळ जाऊन झोपला, अकोला जिल्हा रुग्णालयातील घटना

Farah Khan: तुम्ही आणि सलमान खान एक सारखे...; फराह खानने का केली बाबा रामदेवची सलमान खानशी तुलना

SCROLL FOR NEXT