Paan Gulkand Modak Recipe : तोंडात टाकताच विरघळणारा पान-गुलकंद मोदक, गणपतीच्या नैवेद्यासाठी परफेक्ट रेसिपी

Shreya Maskar

गणेश चतुर्थी

आज गणेश चतुर्थी असून सर्वत्र गणरायाचे आगमन झाले आहे. भाविकांमध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. आता ११ दिवस मोदकांचा नैवेद्य आणि ढोल-ताशांचा गजर पाहायला मिळणार आहे.

Ganesh Chaturthi | pinterest

मोदक

उकडीचे मोदक, तळणीचे मोदक, रव्याचे मोदक, डायफ्रूट्स मोदक तर आपण नेहमीच खातो, मात्र यंदा गणेशोत्सवाला खास विड्याच्या पानाचे मोदक बनवा. भन्नाट रेसिपी आताच नोट करा.

Modak | pinterest

विड्याच्या पानाचे मोदक

विड्याच्या पानाचे मोदक बनवण्यासाठी विड्याची पाने, चांदीचा वर्ख, दूध, मिल्क पावडर, हिरवा रंग, फ्रोजन चेरीचे तुकडे, बडीशेप, धणेडाळ, स्प्रिंकल, गुलकंद, साखर आणि तूप इत्यादी साहित्या लागते.

Paan Modak | pinterest

दूध

विड्याच्या पानाचे मोदक बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये विड्याच्या पानांचे तुकडे करून त्यात थोडे दूध मिक्स करून तयार मिश्रण मिक्सरला वाटून एक पेस्ट बनवा.

Milk | pinterest

मिल्क पावडर

त्यानंतर पॅनमध्ये तूप, उरलेले दूध घालून एक उकळी काढून घ्या. दुधाला उकळी आल्यावर त्यात मिल्क पावडर घालून मिक्स करा.

Milk Powder | pinterest

हिरवा रंग

आता यात वाटलेल्या पानांचे मिश्रण, काही थेंब हिरवा रंग घालून मिश्रण मिक्स करा. छान परतून एक गोळा तयार करा.

Green Color | pinterest

चेरीचे तुकडे

दुसऱ्या बाऊलमध्ये गुलकंद घ्या. त्यात धणे डाळ, बडीशेप, चेरीचे तुकडे, स्प्रिंकल घालून एकत्र करा.

Cherry Pieces | pinterest

गुलकंद

शेवटी मोदकाच्या साच्याला तूप लावून त्यात विड्याच्या पानाचे मिश्रण भरून बोटाने खोलगट भाग तयार करावा. त्यात गुलकंदाचे मिश्रण भरा आणि छान मोदकांचा आकार द्या. अशाप्रकारे विड्याच्या पानाचे मोदक तयार झाले.

Gulkand | pinterest

NEXT : ना उकड, ना जास्त मेहनत! फक्त २ पदार्थांत बनवा गणरायाचे आवडते रवा-खोबऱ्याचे मोदक

Rava Khobryache Modak Recipe | AI PHOTO
येथे क्लिक करा...