Solapur Government Hospital Dr Sanjeev Thakur visit at night  saam tv
Video

Solapur News : सरकारी रुग्णालयात अधिष्ठात्यांचं 'ऑपरेशन'; डॉक्टरांसह ११ कर्मचाऱ्यांवर 'ऑन द स्पॉट' कारवाई, VIDEO

Solapur Government Hospital Doctor : सोलापूर येथील सरकारी रुग्णालयात कामात निष्काळजीपणा केल्याचा फटका डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना बसला आहे. डॉक्टरांसह ११ कर्मचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे.

Nandkumar Joshi

सोलापूर सरकारी रुग्णालयात अधिष्ठात्यांनीच कामात हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांसह ११ कर्मचाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनीच हे 'ऑपरेशन' केलं आहे. सरकारी रुग्णालयाच्या कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका या कारवाई केलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर आहे.

डॉ. ठाकूर यांनी रुग्णालयातील ओपीडी, आयपीडीला अचानक भेट दिली. कामात कसूर करणाऱ्या डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांवर बेधडक कारवाई केली. त्यांच्या एका दिवसाचं वेतन कापलं आहे. शासकीय रुग्णालयामध्ये येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना बाहेरची औषधे लिहून दिल्यास तात्काळ संबंधित डॉक्टर कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. डॉ. संजीव ठाकूर हे रात्रीच्या सुमारास थेट रुग्णालयातील वॉर्डात गेले आणि त्यांनी विविध समस्यांबाबत रुग्णांशी संवाद साधला. रुग्णांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी अॅक्शन प्लान तयार केला आहे. येणाऱ्या काळात सातत्याने कारवाई सुरूच ठेवण्याचा निर्धार अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकच्या भद्रकाली परिसरात दहावीच्या विद्यार्थ्यांवर प्राणघातक हल्ला

Artist Death: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा; ३१ वर्षीय कलाकाराचे अकाली निधन

Paithani Or Silk Saree Blouse Designs: पैठणी आणि सिल्क साड्यांवर उठून दिसतील हे 5 ब्लाऊज पॅटर्न, एकदा नक्की ट्राय करा

Mosquito Safety: डासांसाठी अगरबत्ती घेताय? त्या आधी ही माहिती वाचाच

ZP आणि खासगी शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येकाला मिळणार कॅशलेस वैद्यकीय सुविधा

SCROLL FOR NEXT